Sunetra Pawar Takes Charge As Maharashtra Dy CM: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार आणि अन्य नेते उपस्थित होते. दिवंगत अजित पवार यांच्या खुर्चीत सुनेत्रा पवार यांना बसताना पाहून त्यांचा पुत्र पार्थ पवारांना डोळ्यात अश्रू आवरले नाहीत. हा खूप भावूक क्षण होता. ''दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही'' असे सुनेत्रा पवारांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे..''आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.'' असे सुनेत्रा पवारांनी पुढे म्हटले आहे..''दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन,'' अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. .Cabinet Meeting : सिंचन प्रकल्पासाठी १५ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मान्यता; ८ लाख एकर जमीन ओलिताखाली येणार, मुख्यमंत्र्यांचा दावा .उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल होताच त्यांनी पहिल्यांदा अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर खुर्चीला आणि समोरील टेबलास हात जोडून नमस्कार केला..Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे, बीडच्या पालकमंत्री.त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी आज प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. सिद्धीविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले, पूजा केली. लोककल्याणाचे, विकासाचे कार्य निरंतर पुढे हाकण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले..अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.