Soybean Pera News: खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी अनेकांनी टाळली आहे. या ऐवजी भाजीपाला, फळ पिकांना पसंती दिली आहे. पीक अनेक भागात पक्व होत आले आहे. या आठवड्यात अनेक शेतकरी आपल्या सोयाबीनची कापणी व मळणी करून घेण्याचे नियोजन करीत आहेत. .सोयाबीनची पेरणी मागील उन्हाळ हंगामात एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली होती. धुळे जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांनी उन्हाळ सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु यंदा उन्हाळ सोयाबीन पेरणी खानदेशात कमी झाली आहे. सोयाबीनची पेरणी डिसेंबर, जानेवारीत झाली आहे..Summer Groundnut Sowing: उन्हाळी भुईमुगाची पावणेअकरा हजार हेक्टरवर पेरणी.अनेकांनी कापूस व अन्य पिकांखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीन पीकदेखील चार ते साडेचार महिन्यांचे आहे. सध्या पीक वाढीच्या स्थितीत आहे. काही भागात पीक मळणीवर येत आहे. परंतु यंदा सोयाबीन पेरणी खानदेशात कमी झाली असून, कमी दर व अधिकचा खर्च यामुळे ही पेरणी कमी झाल्याची स्थिती आहे..Summer Crop Sowing: साडेअकरा हजार हेक्टरवर उन्हाळ पिकांची पेरणी.उन्हाळ हंगामासाठी विशेष सोयाबीन बियाणेदेखील बाजारात नाही. शेतकरी आपल्या घरातील बियाण्यावर प्रक्रिया करून त्याची पेरणी करीत होते. त्यात मागील वेळेस काहींना अपयश आले किंवा पेरणी यशस्वी झाली नाही. काहींनी पेरणी केली, पण उत्पादन कमी आले. सोयाबीनची पेरणी खानदेशात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे..जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २२०० हेक्टरवर आहे. नंदुरबारातील पेरणी अल्प अल्याची माहिती मिळाली. मागील हंगामात कृषी यंत्रणांनी तेलबिया उत्पादनवाढीसंबंधी सोयाबीन पेरणीला प्रोत्साहन दिले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.