Jalgaon News: खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा स्थिर आहे. पेरणी २४०० हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २१०० हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे. .धुळे व नंदुरबारात उन्हाळ सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रीम जलसाठाधारकांनी सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती दिली आहे. थंडी अधिक पडेल व सोयाबीनचे उत्पादन घटेल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. यामुळे नंदुरबार, धुळ्यातील पेरणी घटली आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी मागील महिन्यातच झाली आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली आहे. पिकांनाही मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन केले आहे..Summer Soybean Sowing : उन्हाळ सोयाबीन खानदेशात कमी.सोयाबीनचे दर यंदा खरिपात कमी होते. किमान ३२०० व कमाल ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अनेकांना हंगामात मिळाला. आता दरात सुधारणा होत आहे. दर टिकून राहतील व अधिकचा नफा मिळेल, या नियोजनातून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीनची पेरणी धुळे, नंदुरबारात वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण या भागात उन्हाळ सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती दिली जाते..पेरणी गिरणा, तापीकाठालागत अधिकसोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीन रावेर भागात कमी आहे. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात उन्हाळ सोयाबीन आहे..Summer Soybean Sowing : सांगलीत उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी.सोयाबीन पीक २५ ते ३० दिवसाचे झाले आहे. काहींचे पीक दीड महिन्याचे झाले आहे. पेरणी डिसेंबरच्या सुरवातीलाच अनेकांनी केली होती. यामुळे काही शेतकऱ्यांचे पीक ४६ ते ५० दिवसांचेदेखील आहे. पीक बऱ्यापैकी आहे. त्यात ढगाळ वातावरणामुळे दोन वेळेस किडनाशके व इतर फवारण्या घ्याव्या लागल्या आहेत. तसेच त्यात आंतरमशागतदेखील एक वेळेस झाली आहे. पीक बऱ्यापैकी आहे. .त्यात एक वेळेस रासायनिक खतही अनेकांनी दिले आहे. काळ्या कसदार जमिनीतील पीक चांगले असून, वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी लहान फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपात उत्पादन घेतल्यानंतर आपल्याकडील बियाण्याची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी केली आहे. यामुळे बियाण्यावरील मोठा खर्च शेतकऱ्यांनी कमी केल्याची माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.