Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे. पुढे किंवा यंदा उष्णता अधिक राहणार असल्याने अनेकांनी लागवड टाळली आहे. .भेंडीची लागवड अनेक शेतकरी पाट पद्धतीने सिंचन करून करतात. उष्णता अधिक असल्यास सिंचनासाठी पाणीही अधिक लागते. अशात पिकात रोगराईची भीतीही असते. भेंडीची लागवड चोपडा, यावल, एरंडोल, पाचोरा, जामनेर, जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा आदी भागात मिळून सुमारे ४०० हेक्टरवर झाली आहे. ही लागवड ६०० ते ७०० हेक्टरवर अपेक्षित होती..Okra Cultivation : जळगाव जिल्ह्यात भेंडी लागवडीत घट.एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते..Summer Okra Farming: ठिबकद्वारे खते सोडल्याने बहरले भेंडीचे पीक.तसेच अनेक जण फेब्रुवारीमध्ये लागवड करतात. परंतु ही लागवड घटली आहे. भेंडीची ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा ३० ते ३५ दिवसांनंतर भेंडीची काढणी सुरू होईल. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक स्थिर आहे. या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत २० ते २५ रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या भेंडीसही २० रुपये प्रतिकिलोचा दर आहे..पुढे चांगल्या दराची अपेक्षाडिसेंबरमध्ये भेंडीची जळगावच्या बाजारात प्रति दिन सरासरी २२ क्विंटल आवक झाली होती. या महिन्यात मागील आठ दिवसांत ही आवक प्रति दिन सरासरी १८ क्विंटल एवढीच आहे. भेंडीला ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कमी दर मिळाला होता. लागवड कमी झाल्याने उन्हाळ भेंडींस दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.