Akola News: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबियाअंतर्गत उन्हाळी हंगामासाठी भुईमूग पिकासाठी १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण तसेच पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. .देशातील खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, तेलबियांचे उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत उन्हाळी भुईमूग पिकासाठी कादरी लेपाक्षी (K-१८१२) या वाणाचे हेक्टरी १५० किलो शेंगा प्रमाणित बियाणे (११४ रुपये प्रति किलो) हे १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर व कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देय राहील..Sesame Seeds Scheme: शंभर टक्के अनुदानावर मिळणार तीळ बियाणे.शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडून भुईमूग बियाणे २० किलो किंवा ३० किलो पॅकिंग साईजमध्ये उपलब्ध असून, क्षेत्रानुसार आवश्यकतेपेक्षा पॅकिंग साईजनुसार जास्त बियाणे लागत असल्यास त्यावरील अतिरिक्त रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः भरावी लागणार आहे. तसेच, उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक (वाण -गिरनार-४) अंतर्गत हेक्टरी १०० किलो शेंगा प्रमाणित बियाणे (११४ रुपये प्रति किलो) १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी किमान ०.४० हेक्टर क्षेत्राची अट आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केला आहे..Summer Onion Cultivation: उन्हाळी कांदा लागवडीचे सुधारित तंत्र; उत्पादन वाढवा, नुकसान कमी करा!.भुईमूग पिकाच्या बियाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgrilLogin या संकेतस्थळावर ‘प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक, कीटकनाशके आणि खते’ याअंतर्गत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे..जिल्ह्याला ३४६८ हेक्टरचा लक्ष्यांकलाभार्थ्यांना ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र व इच्छुक शेतकरी बांधवांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. पीक प्रात्यक्षिकासाठी जिल्ह्याला १८०० हेक्टर तर प्रमाणित बियाणे वितरण उन्हाळी भुईमूगसाठी ३४६८ हेक्टर भौतिक लक्ष्यांक निर्धारित करण्यात आलेला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.