Crop Pattern: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२६) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता.२०) पर्यंत ११ हजार ७६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यांत यंदाच्या उन्हाळी पिकांमध्ये भुईमुगाचा पेरा सर्वाधिक म्हणजे ९ हजार २६५ हेक्टर आहे.यंदा तिळाचा पेऱ्यात वाढ, तर सोयाबीन, सूर्यफुलाच्या पेऱ्यात घट झाली अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..परभणी जिल्ह्यात उन्हाळी पिकांची १२ हजार ३०२ हेक्टरपैकी ४ हजार १३ हेक्टर (३२.६२ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ६५४ पैकी ७१३ हेक्टर (४३.११टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीची १४९ हेक्टर,मक्याची १ हजार ३५४ पैकी २९८ हेक्टर (२२.०२ टक्के), बाजरीची ३०० पैकी २६६ हेक्टर (८८.५१ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५८.४८ पैकी ३० हेक्टर (५१.४८ टक्के) पेरणी झाली आहे. .Summer Crop Sowing: उन्हाळी हंगामात ५३ हजार हेक्टरवर पेरणी.त्यात मुगाची ५८.२८ पैकी २७ हेक्टर (४६.३३ टक्के) पेरणी झाली आहे. तेलबियांची १० हजार ५८८ पैकी ३ हजार २७० हेक्टरवर (३०.८८ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ७ हजार २३४ पैकी ३ हजार २३४ हेक्टर (४३.८१ टक्के), सोयाबीनची ३ हजार २३३ पैकी २८.२ हेक्टर (०.८७ टक्के), तिळाचे सरासरी क्षेत्र १४.३५ हेक्टर असताना ७०.६ हेक्टर पेरणी झाली आहे. सोनपेठ तालुक्यात उन्हाळी पेरा वाढला आहे..Summer Crop Sowing : देशात उन्हाळी पेरणीत भात-मका पिछाडीवर; भुईमूग-बाजरीने घेतली आघाडी.हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांची १२ हजार ७०५ हेक्टर पैकी ७ हजार ७५१ हेक्टरवर (६१ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांची १ हजार ४४८ पैकी ९२५ हेक्टरवर (६३.८८ टक्के) पेरणी झाली. त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ४६८ हेक्टर असताना ४८५ हेक्टर (१०३.६३टक्के), मक्याची ९८० पैकी २८४ हेक्टरवर (२९.०१ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५३७ पैकी ३७२ हेक्टर (६९.३७ टक्के) पेरणी झाली..त्यात मुगाची ४६७ पैकी ३१९ हेक्टर (६८.२५ टक्के), उडदाची ६९.९५ पैकी ३० हेक्टर (४२.८९ टक्के) पेरणी झाली. तेलबियांची १० हजार ७१९ पैकी ६ हजार ४५३ हेक्टरवर (६०.१९ टक्के) पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार १९० पैकी ६ हजार ९९ हेक्टर (९८.५२ टक्के), सोयाबीनची ३ हजार ६८८ पैकी १४ हेक्टर (०.३७ टक्का), तिळाचे सरासरी क्षेत्र १५५ हेक्टर असताना यंदा २७० हेक्टर (१७३.९२ टक्के) तर सूर्यफुलाची ३१५ पैकी ३० हेक्टरवर (९.५२ टक्के) पेरणी झाली आहे.कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात उन्हाळी पेऱ्यात वाढ झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.