Farming Updates: मराठवाड्यातील सर्वसाधारण एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत उन्हाळी पिकांची सुमारे ५३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी करताना शेतकऱ्यांनी बाजरी, तीळ, उन्हाळी मका आदी पिकांना प्राधान्य दिले आहे..मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण ५३,३७३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९९८३ हेक्टरवर उन्हाळी पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३७.४४ टक्के इतकी आहे. .Summer Crop Sowing: सांगलीत उन्हाळी हंगामात तीन हजार हेक्टरवर पेरणी.दुसरीकडे लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यात सर्वसाधारण ६७,१७२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३२ हजार ९९० हेक्टरवर उन्हाळी पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ४९.११ टक्के इतकी आहे. रब्बीची पेरणी तीन टप्प्यात झाल्याने अजूनही रब्बीची अनेक भागात काढणी, मळणी सुरू असल्याची स्थिती आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी उन्हाळी पिकाच्या पेरणीला प्राधान्य देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..Summer Crop Sowing: मराठवाड्यात ४३ हजार ८४२ हेक्टरवर उन्हाळी पेरणी.उन्हाळी मकाची ३९३७ हेक्टरवर लागवडछत्रपती संभाजीनगर,जालना व बीड या तीन जिल्ह्यांत उन्हाळी मकाची सर्वसाधारण ९८५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३९३७ हेक्टरवर लागवड झाली. उन्हाळी ज्वारीची ३६२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३२९ हेक्टरवर, बाजरीची १७,१६१ हेक्टरच्या तुलनेत १३,६५६ हेक्टरवर, इतर तृणधान्य ४,१०६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७१ हेक्टरवर,.उन्हाळी मुग १८१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २५ हेक्टर, उन्हाळी उडीद सर्वसाधारण ६३ हेक्टरच्या तुलनेत एक हेक्टरवर इतर कडधान्य १५१५ हेक्टरच्या तुलनेत १४ हेक्टरवर, उन्हाळी भुईमूग ५५४६ हेक्टरच्या तुलनेत १६६९ हेक्टरवर, उन्हाळी सूर्यफूल १२४८ क्षेत्राच्या तुलनेत ३१ हेक्टर, उन्हाळी तीळ १९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २० हेक्टरवर, उन्हाळी सोयाबीन ७०५५ हेक्टरच्या तुलनेत १६ हेक्टरवर तर उन्हाळी गळीत धान्य ६०८८ हेक्टरच्या तुलनेत १३ हेक्टरवर पेरली गेली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.