Nandurbar News: खानदेशात ऊसलागवड सुरू आहे. यंदा लागवड सुमारे ५०० ते ७०० हेक्टरने वाढेल, असे दिसत आहे. उसाची तोडणी मागील हंगामात वेळेत झाली. यंदाही तोडणी गतीने सुरू आहे. कापूस व अन्य भाजीपाला पिके परवडत नसल्याने ऊस लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. .नंदुरबार जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या वर्षीदेखील ऊसलागवड केली आहे. यंदाही तेथील लागवड अधिक राहील. गेल्या दोन वर्षांपासून खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून उसाची तोडणी व गाळप बऱ्यापैकी होत आहे. नंदुरबारमध्ये चार व जळगावात दोन कारखाने सुरू असतात. यामुळे तोडणीस गती येत असून, यंदा लागवडीत वाढ होईल, असे दिसत आहे. ऊस लागवड नोव्हेंबरमध्ये सुरू झाली..Sugarcane Cultivation: सिंचनात वाढ अन् ऊस लागवडीला आला भर.लागवड अजूनही सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर, धुळ्यात शिरपूर, साक्री, धुळे, नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा भागांत ऊस पीक आहे. नंदुरबारमधील लागवड १४ हजार ते १४ हजार ५०० हेक्टरवर होईल, असे दिसत आहे. जळगावातील लागवडदेखील १३ ते १४ हजार हेक्टरपर्यंत राहणार आहे. तर धुळ्यातील लागवड साडेचार ते पाच हजार हेक्टरवर होईल..Sugarcane Cultivation: ऊस लागवड, व्यवस्थापनावर मार्गदर्शन.लागवड सुरूच आहे. ऑक्टोबरमध्ये ऊसगाळप सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु यंदा ऊस गाळप नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू झाले. नंदुरबारमध्ये अधिकची लागवड झाली आहे. कापूस, भाजीपाला पिकांऐवजी अनेकांनी उसाला पसंती दिली आहे.बऱ्यापैकी उत्पन्न देणारे आणि कमी खर्च व कमी जोखमीचे पीक म्हणून उसाची लागवड आपापल्या शेतात शेतकरी करीत आहेत. पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात येते.ऊस पीक एक वर्षात तोडणीवर येते. केळीचेदेखील वर्षभरात उत्पादन हाती येते. केळी लागवड वाढली आहे. केळीचा खर्चही अधिक आहे. कापूस पिकात तोटा आहे. पाऊसमान यंदा चांगले आहे. अनेक प्रकल्पांतून रब्बीसाठी पाणी मिळत आहे. यामुळे अनेकांनी उसाला पसंती दिली आहे..बेणे सहज उपलब्धउसाचे बेणे कारखाने आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. ऊस लागवड वाढत आहे. पण बेणे किंवा बियाणे मुबलक आहे. दर्जेदार अधिक उत्पादनक्षम वाण शेतकऱ्यांना कारखाने उपलब्ध करून देत आहेत.काही शेतकरी आपल्या संपर्काच्या जोरावर ऊस बेणे आणत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ऊस बेण्यासाठी शिरपूर, चोपडा भागातील शेतकरी जात आहेत. खानदेशात ऊस लागवड सुरूच राहणार आहे. ही लागवड या महिन्यातही होईल, असे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.