Maharashtra Sugarcane Season: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलन तीव्र झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आज (दि. ३ नोव्हेंबर) किणी टोलनाक्यावर पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली..पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली. एका शेतकऱ्याने हाताने आसूड ओढत कारखानदार, सरकारचे लक्ष वेधून घेतले. आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही कारखानदार आणि सरकारवर असाच आसूड ओढू, असा इशारा त्यांनी दिला. उसाला कारखान्यांनी प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. .Sugarcane Rate Dispute: उसाला प्रतिटन ३,८५० रुपयांचा तोडगाही अमान्य; शेतकरी ५ हजारांवर ठाम.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार प्रतिटन ३,६०० ते ३,८०० रुपयांपर्यंत पहिली उचल व सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने ३,६०० रूपये पहिली उचल देण्याची भाषा करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना प्रतिटन ३,४५० ते ३,६५० रुपयांच्या आसपास एफआरपी बसते. हा दर आम्हाला मान्य नसल्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. .Sugarcane Farmers Protest: ऊसदर प्रश्नी आंदोलन तीव्र, कारखान्यांच्या ठिकाणी छावण्या, ३ नोव्हेंबरला पुणे- बंगळूर महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा.काटामारी व रिकव्हरी चोरीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खते, बी- बियाणे, किडनाशके, औषधे यांचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या संकटातून बाहेर काढण्याऐवजी कारखानदार व सरकार दोघेही दरोडा टाकत असल्याचा आरोप शेट्टींनी केला..पोलिसांनी बजावली नोटीसदरम्यान, आज होत असलेल्या आंदोलनाच्याआधीच शिरोळ पोलिसांनी राजू शेट्टी यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता सन २०२३ चे कलम १६८ नुसार नोटीस बजावली. महामार्गावरील आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटिशीत नमूद केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.