Drought Impact: शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे २५ ते ३० टक्के उत्पादन घटले आहे. हंगाम लवकर सुरू करून कारखान्यांनी अपरिपक्व उसाचे गाळप सुरू केले आहे. त्यामुळे चांगली रिकव्हरी मिळणार नाही. ३८ रुपयांवर साखर असताना ३ हजार २०० रुपये जाहीर केला. मग आता साखरेचे दर ५० रुपयांच्या वर आहेत. मग किमान ४ हजार रुपये पहिला हफ्ता जाहीर करायला अडचण काय, असा प्रश्न शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. दरम्यान, दुसऱ्यांदा झालेल्या बैठकीतही दराबाबत काहीही तोडगा निघाला नाही..गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला, तरी कारखाने दराबाबत बोलत नाहीत. शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या होणारी लूट थांबणार तरी कधी असा प्रश्न जिल्हाभरातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. जिल्हा बॅंकेच्या सत्तेसाठी जसे सर्वपक्षीय कारखानदार एकत्र आले तसेच शेतकऱ्यांना दर देण्यासाठी एकत्र या अशी अपेक्षा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीसह शेतकऱ्यांनी केली..Sugarcane Price Dispute: कोल्हापूरचा ऊसदर पॅटर्न सांगलीत लागू करा; राजू शेट्टी यांचा दिवाळीत कारखाने बंद करण्याचा इशारा.अहिल्यानगर येथे ऊसदराबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, यांच्यासह प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते..Sugarcane Price Settlement: ऊसदराचा तिढा अखेर सुटला; कोल्हापुरात ऊसतोडणीला सुरुवात!.ऊसदराबाबत दुसऱ्यांदा बैठक झाली, पण दराबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. उसाचे मोठ्या प्रमाणात गाळप झालेले असताना ऊसदर का जाहीर होत नाही असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना वजनाचे मेसेज तत्काळ कधी मिळणार तसेच वजनकाटे तपासणीसाठी जाताना संबंधित विभाग कारखान्यांना आधीच कल्पना देत असल्याचा आरोप केला..शिवसेना शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आरले तसेच पाथर्डी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरजे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत आक्रमक भूमिका माडंली. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी ऊस दर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत बैठक घेऊन ९ तारखेपर्यंत दर जाहीर करावे असे सांगितले. बैठकीत अशोक सहकारी कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांनी दर जाहीर करण्याबाबत भूमिका स्पष्ट करताना जिल्हा सहकारी बॅंकेच्या साखर कारखान्यांच्या धोरणानंतर दर जाहीर करणे योग्य राहील. सध्या बॅंकेवर प्रशासक आहेत, नवीन संचालकांची बैठक होईल. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल त्यानंतर ते कारखान्यांना काय मदत करतात. त्यानुसार दर जाहीर करणार असल्याचे सांगितले. यावर शेतकरी संघटनांनी आक्षेप नोंदवला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.