Sugarcane Bill Issue: साखर हंगाम संपून मार्चअखेर उलटली, तरी शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे कारखानदारांच्या तिजोरीतच अडकले आहेत. आता संयम संपला असून, येत्या आठ दिवसांत थकीत ऊसबील १५ टक्के व्याजासह द्यावे, अन्यथा थेट कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत वसुली आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी दिला आहे..श्री. शेळके पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी कायद्यानुसार ठरावीक काळात बिल देणे बंधनकारक असतानाही जाणीवपूर्वक विलंब केला आहे. .Sugarcane Payment Delay: ‘ट्वेंटीवन’कडून ऊसबिलाचे वाटप सुरू.आज शेतकऱ्यांकडे बँकेचे हप्ते भरण्यासाठी, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य किंवा दैनंदिन गरजांसाठीही पैसे नाहीत. स्वतःची चूक नसताना बळीराजा कर्जबाजारी आणि हतबल झाला आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. कारखान्यांच्या सत्तास्थानी खासदार, आमदार आणि मंत्री असतानाही शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याबद्दल संघटनेने संताप व्यक्त केला आहे. .Sugarcane Payment Delay: राज्यातील १३२ कारखान्यांनी थकविली ‘एफआरपी’ रक्कम.कायद्याचे उल्लंघन होत असूनही प्रशासन केवळ पगार घेण्यापुरते उरले असल्याची टीका करत, प्रशासकीय कार्यालयांतही बेमुदत मुक्काम ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी कारखानदार आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे..प्रमुख मागण्या...थकीत बिलांसाठी आठ दिवसांची मुदतविलंब झाल्याबद्दल १५ टक्के व्याजासह रक्कम द्याअध्यक्ष व संचालकांच्या निवासस्थानी वसुलीसाठी धडक देणार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.