Nanded News: नांदेड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसामुळे उसाचे उत्पादन भरघोस झाले असले तरी साखर कारखान्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वेळेत ऊस तोडणी न झाल्याने अनेक शेतांमध्ये उसाला तुरा येऊ लागला असून, त्यामुळे उसाचे वजन व साखर उतारा घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा कारखान्यांच्या दुर्लक्षामुळे वाया जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे..जिल्ह्यात एक लाख ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. उसाची उपलब्धता मुबलक असतानाही गाळपाचा वेग अत्यंत संथ आहे. सध्या कारखान्यांनी मिळून सुमारे ५२ लाख टन उसाचे गाळप केले असले, तरी अजूनही लाखो टन ऊस शेतात उभा आहे. तोडणीच्या तारखा वेळेवर न मिळाल्याने शेतकरी कारखान्यांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. .Flower Farmer Issue: बाजारभावातील घसरणीमुळे झेंडू उत्पादक अडचणीत.तोडणीला विलंब म्हणजे शेतकऱ्यांसाठी थेट नुकसान. उसाला तुरा आल्यास ऊस हलका होतो, उतारा घटतो, कारखान्याकडून दर कपात होते. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय. पाणी, खत, मजूर यावर हजारो रुपये खर्च करून उभा केलेला ऊस कारखान्यांच्या निष्काळजीपणाने हातातून जातोय, असा रोष शेतकरी व्यक्त करत आहेत..Sugarcane Flowering: तुरा आलेला ऊस का नुकसानकारक ठरतो? जाणून घ्या सविस्तर माहिती..लागवड केल्यानंतर उसाची तोडणी सरासरी १० ते १२ महिन्यानंतर केली जाते. तोडणीला विलंब झाल्यास उसाला तुरा आल्यानंतर तोडणीअभावी उसाचे वजन कमी होऊ शकते..तोडणीसाठी मजुरांचीही कमतरतातोडणी मजुरांची कमतरता, वाहतुकीचा अभाव आणि कारखान्यांचा ढिसाळ कारभार यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. गाळपाचा वेग तातडीने वाढवला नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान अटळ असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. वेळेवर ऊस उचलला नाही, तर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा ठाम इशाराही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.