Jalna News: ऊसतोडणीचा हंगाम सध्या जोमाने सुरू आहे. मात्र, उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे ग्रामीण भागातील रस्ते आता ‘डेथ ट्रॅप’ बनू लागले असून, निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याचे चित्र सर्वच रस्त्यांवर दिसत आहे..घनसावंगी आणि अंबड तालुक्यांत तीन साखर कारखाने आहेत. त्याचबरोबर तालुक्यात असलेल्या अतिरिक्त उसामुळे बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखान्यांची वाहने या दोन तालुक्यांतील ग्रामीण भागात ऊसतोड करताना दिसून येत आहेत..Sugarcane Weighing Irregularities: उसाची काटामारी आणि अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या तीन कारखान्यांबरोबरच बाहेरील जिल्ह्यात ऊस जाताना मुख्य रस्त्यांबरोबर ग्रामीण भागातील रस्त्यावर ट्रक, ट्रॅक्टर ही वाहने दिसून येत आहेत. सदरील ऊस वाहतूक करणाऱ्या बहुतांश ट्रॉली आणि बैलगाड्यांना पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर (रेडियम) लावलेले नसतात. रात्रीच्या वेळी उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी असल्यास किंवा संथगतीने चालली असल्यास पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नाही..Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत.यामुळे धडक बसून भीषण अपघात होत आहेत. तसेच अनेक ट्रॅक्टरचालक एकामागे एक दोन ट्रॉली जोडतात, ज्यामुळे वळणावर अंदाज चुकून अपघात होतात. वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडलेला ऊस दुचाकीस्वारांसाठी जीवघेणा ठरत आहे. ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करताना मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवत असतात. त्यामुळे पाठीमागून कोणते वाहन आले याचाही अंदाज त्यांना लागत नाही..रस्त्यावर ऊस पडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि रात्रीच्या वेळी विना रिफ्लेक्टर धावणाऱ्या वाहनांवर तत्काळ जप्तीची कारवाई करावी. तसेच रस्त्यावर ऊस वाहतुकीची वाहने उभी करू नये. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.अर्जुन भोसले, भाजप कार्यकर्ता, तीर्थपुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.