Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंदबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने ऊसतोडणी सुरू होऊ शकली नाही. एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू होणार असल्याने कारखान्यांनी अपेक्षित ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी ऊसतोडी सुरू केल्या, पण आंदोलनाबरोबर जोरदार पावसानेही ऊसतोडणी यंत्रणेला अडथळे आणले. विशेष करून शिरोळ हातकणंगले तालुक्यात स्वाभिमानी संघटनेसह आंदोलन अंकुश संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने ऊस तोडणी बंद असल्याचे चित्र होते. .दरम्यान, जिल्ह्यातील गळीत हंगाम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच शेतकरी संघटनांनी ३५०० रुपये प्रतिटन दराची मागणी केली आहे. त्यामुळे दरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक घेणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली..Sugarcane Farmers: वाहनचालकास ‘एन्ट्री’ नाही, ऊस तोडीसाठी पैसे नाहीत.शेतकरी संघटनांनी उसाला प्रतिटन ३५०० रुपये भाव देण्याची मागणी केली असून, साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी ३२०० ते ३४०० दरम्यान दर जाहीर केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी लवकरच बैठकीचे आयोजन करणार आहेत. त्यातून दराच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले..Sugarcane Price Hike: उत्तर प्रदेश देणार टनास ४००० रुपये.कारखान्यांनी जाहीर केलेल्या ३४०० ते ३४५० दरावर स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नापसंती व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनो आपण ३७५१ रुपयांची मागणी केली आहे. आता आपण संघटित होऊया, असे आवाहन त्यांनी केले आहे..बेळगावातही आंदोलन पेटलेउसाचे भाव निश्चित करूनच कारखान्यांनी ऊसगाळप सुरू करावे. कारखान्यांकडे असलेली शेतकऱ्यांची थकित बाकी त्वरित देण्यात यावी. या मागण्यांसाठी गुरुवारी (ता.३०) शेतकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसेरू सेने, शेतकरी विकास संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.