Majalgaon News: दिवाळी होताच ऊस गाळपासाठी कारखान्यांचे बॉयलर पेटले असले तरी, अनेक शेतकरी आजही ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहेत. कारखाना प्रशासनाकडे ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने ऊस तोडणीसाठी टोळ्या येत नाहीत. ऊस लागवड करून वर्ष लोटल्याने आता उसाला तुरे दिसू लागले आहेत, तरीही कारखानदार मात्र शेतकऱ्यांना आणखी काही काळ ‘दम धरण्याचा’ सल्ला देत आहेत..मागील दोन वर्षांपासून होत असलेल्या मुबलक पावसामुळे माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरील तिन्ही तालुक्यातील छोटी-मोठी धरणे तुडुंब भरलेली असल्याने, यंदाही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. गतवर्षीही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केल्याने, या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास २५,००० हेक्टरपेक्षा जास्त उसाचे क्षेत्र आहे..Sugarcane Farming: ऊस शेतीसाठी सूक्ष्म व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे : पाटील.दिवाळीनंतर यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाला सुरवात होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, कारखाना प्रशासनाकडे ऊसतोड मजूर आणि वाहनांची कमतरता असल्याने परिसरातील अनेक भागात अद्याप ऊसतोडणी मजूर पोहोचलेले नाहीत. ऊस लागवड करून वर्ष उलटून गेल्याने उसाला तुरे फुटले असून शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. ऊस लागवड केल्यापासून वर्षभराच्या आत गाळपास गेल्यास वजन भरते आणि उताराही चांगला मिळून शेतकऱ्यांचा फायदा होतो. .परंतु, वर्ष उलटूनही अनेक भागात ऊस गाळपासाठी जात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊसतोडणीसाठी शेतकरी कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे टोळीची मागणी करत असले तरी, अधिकारी मात्र चालढकल करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ.नुकसानीची भीती; हार्वेस्टरला नापसंतीकारखाना प्रशासनाने जलद ऊसतोडणी करण्यासाठी यावर्षी हार्वेस्टर मशीनच्या करारावर भर दिला आहे. वरील तिन्ही कारखान्यांकडे हार्वेस्टरची संख्या जास्त आहे; परंतु हार्वेस्टरमुळे उसाचे नुकसान होते, त्यामुळे शेतकरी हार्वेस्टरपेक्षा मजुरांकडून केल्या जाणाऱ्या तोडणीलाच पसंती देत आहेत..कारखान्याचे नाव गाळप (मेट्रिक टन)जय महेश कारखाना ५,२४,१६७लोकनेते सुंदरराव सोळंके कारखाना ३,४८,२५०छत्रपती कारखाना २,१२,३३०एकूण गाळप १०,८४,७४७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.