Kolhapur News : राज्यभरात सलग पडणाऱ्या पावसामुळे ऊस वाढीला बाधा येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी अतिपावसाचा फटका बसणार आहे. बहुतांश ऊस पट्ट्यात मे महिन्यापासूनच पावसाचा जोर कायम आहे. शिवारांना आवश्यक असा वाफसा मिळालेला नाही. परिणामी खत व्यवस्थापनासह अन्य शेतीकामे करणे कठीण झाले आहे..सातत्याने ढगाळ हवामान आणि ओलाव्यामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. तांबेरा, पोक्का बोंग, मावा, करपा, आदींसह अन्य रोग किडीने उसाला पोखरण्यास सुरुवात केल्याने ऊस उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. या स्थितीचा थेट परिणाम हंगामातील ऊस उत्पादनावर होऊ शकतो, असा इशारा ऊस तज्ज्ञांनी दिला आहे. .Sugarcane FRP Dues : सोलापूर जिल्ह्यात ४२ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकित.दरम्यान, अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना सावध केले असून वेळीच कीडनियंत्रण व अन्य उपाययोजना करून ऊस वाचवण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि मराठवाडा या भागांतही कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याने हंगामाच्या सुरुवातीपासूनच उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे..राज्यात गेल्या वर्षीपेक्षा ऊस लागवड क्षेत्रात आठ टक्क्यांनी वाढ होऊन उसाचे १४.९५ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. दुष्काळामुळे मागील वर्षी मोठा फटका बसल्यानंतर यंदा महाराष्ट्राचा ऊस हंगाम चांगला ठरेल असे आडाखे बांधण्यात येत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने उसाला मोठा दिलासा मिळाला. पण पाऊस पूर्णपणे थांबण्याचे नावच घेत नसल्याने उसाच्या वाढीला धोका निर्माण झाला. राज्यात उत्पादनाच्या दृष्टीने राज्यात आघाडीवर असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात फारशी समाधानकारक स्थिती नसल्याने ऊस उत्पादकांनी सांगितले..Sugarcane Disease : उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव.उसाला पावसाचा फटका बसण्याच्या शक्यतेला काही कारखान्यांच्या शेती विभागाच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला. यंदा पूर फार वेळ टिकला नसल्याने नदी काठावरील पिकांचे जादा पाण्यामुळे होणारे नुकसान टळले हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब असल्याचे उत्पादकांनी सांगितले. यंदाचा हंगाम अवघ्या एक ते दीड महिन्यावर आला आहे. .गेल्या वर्षी कमी गाळप झाल्याने कारखाने हवालदिल झाले होते. यंदा अतिपाऊस व प्रतिकूल हवामानामुळे गाळपावर परिणाम होईल का? अशी भीती कारखान्यांना सतावू लागली आहे..यंदा विविध रोग किडींनी आम्हाला सतावले आहे. वाफसा तर नाहीच पण उसाचा तजेलदारपणाही कमी झाला आहे. यामुळे सध्या अपेक्षित वाढ दिसत नाही यामुळे उत्पादन घट अटळ आहे.- अमोल खोत, ऊस उत्पादक, करनूर, ता.कागल, जि. कोल्हापूर.सातत्याने ढगाळ हवामान व पाऊस अशा हवामानामुळे अनेक ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रियेला अडथळे येत आहेत. यामुळे वाढ अपेक्षित होत नाही. हवामानातील प्रतिकूल बदलामुळे उसाच्या वजनावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो.- डॉ. अशोक पिसाळ, सेवानिवृत्त सहयोगी अधिष्ठाता, कोल्हापूर कृषी महाविद्यालय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.