Jalgaon News: खानदेशात उसाचा चारा यंदा काहीसा महाग आहे. ऊस लागवड स्थिर तर काही भागात कमी आहे. चाऱ्याची मागणी आहे. यामुळे उसाचा चारा अनेक भागात दुरापास्त झाल्याचे दिसत आहे. .उसाचे पीक काही नवे नाही. ऊस तोडणी मजूर दिवसभर ऊस तोडून येणारी बांडी किंवा उसाच्या वरच्या भागातील शेंडा सायंकाळी जवळच्या गावात विकतात. मात्र ही बांडी आता शंभर रुपयांत कमी होत होत तीनशे कांड्यावर आली असून, यावर्षी ऊस लागवड काही भागात कमी झाल्याने ही महागाई झाल्याचे दिसून आले आहे..Sugarcane Fodder: उसाचा चारा उपलब्ध होण्यास खानदेशात सुरुवात.उसाच्या या चाऱ्यास खानदेशात वाढे किंवा बांडी म्हटले जाते. खानदेशात गेली अनेक वर्षे उसाचे पीक घेतले जाते. तेव्हापासून बांडी विक्री होते. पूर्वी ही बांडी बरीच स्वस्त मिळत, असे मात्र महागाई, टंचाई, वाढती मागणी आदी गोष्टीमुळे आता ही बांडी महागली आहे..गेल्या काही वर्षांत ही बांडी दहा वाढ्यांची, पाच वाढ्यांची, तीन वाढ्यांची झाली. त्यानंतर दररोजची बंधी असलेल्या गुरे मालकांनी एव्हड्या वाढ्यांची बांडी सोडून ती गुरांना टाकण्याचे श्रम कमी करण्यासाठी तेवढ्या कांड्यांचा भेला बांधण्याचा मार्ग पुढे आला. पूर्वी तर शेतमालकलाही पाच कांड्याचे पंचवीस, नंतर दहा, तर कधी पाच पुडे मिळत होते. आता तेही काही भागात मिळत नाही. काहीही असले तरी घटणाऱ्या ऊस लागवडीचा परिणाम बांडीच्या भावावर दिसून आला आहे..Sugarcane Fodder : मालेगावला ऊस बांडीच्या चाऱ्याच्या आवकेत वाढ.खानदेशात चाळीसगाव, यावल, चोपडा, अमळनेर या भागात ही बांडी विक्रीस येते. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात शहादा, तळोदा व नवापूर भागातच ही बांडी विक्रीस येते. सर्वत्र ही बांडी उपलब्ध होत नाही. ऊस गाळप वेगात सुरू असल्याने बांडी सध्या मिळत आहे. पुढे किंवा फेब्रुवारी अखेरीस एक तोटा किंवा बांडीही मिळणे दुरापास्त होईल, असेही चित्र आहे..अधिकचा खर्च पशुपालक किंवा दूध उत्पादक शेतकरी बांडी खरेदी करतात. खानदेशात विविध साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ही बांडी विक्रीस येत आहे. त्यात १०० रुपयात ३०० बांडी मिळत आहे. काही भागात ही बांडी खरेदीसाठी शेतकरी प्रतीक्षा करतात. करण दुधाळ पशुधनास ही बांडी उपयुक्त मानली जाते. यंदा ऊस बऱ्यापैकी आहे. परंतु चारा कमी असल्याने या बांडीचाही तुटवडा दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.