Sugarcane Prices: ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराने अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. आठ दिवसांत उसाला प्रतिटन किमान चार हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा सोमवारपासून (ता. १६) येडशी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी दिला आहे. .याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, विविध निवेदने, साखर कारखानदारांच्या प्रत्यक्ष भेटी आणि राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..Sugarcane Rates: उसाला योग्य दर मिळेपर्यंत माघार नाही : राजू शेळके.मात्र, अद्याप जिल्ह्यातील कारखानदारांकडून ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला एकही कारखानदार उपस्थित राहिला नाही. परिणामी बैठक निष्फळ ठरली..Sugarcane Rates: ऊसदरासाठी चंदगड तालुक्यात शेतकरी आक्रमक.त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप बैठक आयोजित करण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, वाहतूक आणि सिंचनाचा खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे..त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी प्रतिटन किमान चार हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. तसेच ऊस गाळप झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात देताना धनाजी पेंदे, तानाजी पाटील, विष्णुदास काळे, कमलाकर पवार, मकबूल मुल्ला, बाळासाहेब मडके, प्रशांत जाधव, सचिन पवार उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.