Kolhapur News : पुढील ऊस गाळप हंगाम तोंडावर आला तरी राज्यातील ५४ कारखान्यांनी ऑगस्टअखेर ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम थकविली आहे. १४६ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार होणारी संपूर्ण रक्कम अदा केली आहे. २८ कारखान्यांविरोधात महसूल वसुली प्रमाणपत्राची (आरआरसी) कारवाई करण्यात आली आहे..ऊस गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक आहे. जर कारखाना हे पैसे देण्यास अपयशी ठरला तर ही कारवाई केली जाते. यामुळे साखर आयुक्तालयाने एफआरपीची पूर्ण रक्कम देण्यास विलंब करणाऱ्या कारखान्यांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत..Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८०.९१ कोटींची एफआरपी थकीत.अजूनही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ३०४ कोटी रुपये थकविले आहेत. ८० ते ९९ टक्के एफआरपी ५० साखर कारखान्यांनी दिली आहे. ६० ते ८० टक्क्यांपर्यंत एफआरपी २ कारखान्यांनी दिली आहे. .६० टक्क्यांपर्यंत एफआरपी देणारे कारखानेही २ आहेत. पश्चिम राज्यातील काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. गेल्या हंगामात २०० कारखान्यांनी ८५५.१० लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण देय असलेली एफआरपी रक्कम ३१,५९८ कोटी रुपये होती. यापैकी ३१,२९४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत..Sugarcane FRP: एकरकमी एफआरपीप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी: राजू शेट्टी .उत्पादकांना पूर्ण रकमेची प्रतीक्षागेल्या वर्षी उसाचे उत्पादन घटले. यामुळे अपेक्षित उत्पादन न आल्याने उत्पादकांना आर्थिक फटका बसला. अगदी मातब्बर उत्पादकांच्या ऊस उत्पादनातही एकरी दहा टनांपर्यंत घट झाली. उत्पादन खर्च वाढल्याने गत वर्षीचा हंगाम उत्पादकांना तोट्यात गेला. यातच एफआरपीची पूर्ण रक्कम मिळविण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत असल्याने उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत..कारखाने दुहेरी अडचणीतगेल्या वर्षीचा हंगाम कमी चालल्याने अनेक कारखान्यांचे अर्थशास्त्र बिघडले. यामुळे एफआरपीला विलंब होत असल्याची माहिती थकित कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिली. गेल्या वर्षी अनेक भागात कमी प्रतीचा ऊस उपलब्ध झाला यामुळे उतारा घटला. यामुळे क्षमते इतके गाळप झाले नाही. कर्जाचा वाढलेला बोजा, उच्च परिचालन खर्च यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने आम्हाला अजूनही शंभर टक्के एफआरपी देण्यासाठी झगडावे लागत असल्याचे कारखानदारांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.