Sugar Price: साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये करा: शेट्टी
Sugarcane Farmer Protest: साखरेची किमान विक्री किंमत प्रति किलो ५० रुपये आणि ‘सी-हेवी’ मोलॅसिसचा दर प्रति लिटर ७० रुपये करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २९) हुबळीत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.