कारखान्यांनी अपेक्षित दर जाहीर केला नसल्याने कोल्हापूर ऊस पट्ट्यात शेतकरी संघटनांचे आंदोलन आता उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनीही ऊस दरासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहेकर्नाटकातील सर्व साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांएवढा उसाला दर द्यावा, शेतकरी संघटनांची मागणी.Sugarcane Price: कर्नाटकातील साखर हंगाम महाराष्ट्रातील हंगामापूर्वीच म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी सुरु झाला. तर महाराष्ट्रातील हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होईल. त्याआधी काही कारखान्यांनी अपेक्षित दर जाहीर केला नसल्याने कोल्हापूर ऊस पट्ट्यात शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे. आता उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनीही ऊस दरासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी ३० ऑक्टोबर रोजी मुदलगी तालुक्यात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कर्नाटक सरकारकडे महाराष्ट्रातील ऊस दरांप्रमाणेच ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च वगळून प्रति टनाला ३,५०० रुपये दर जाहीर करण्याची मागणी केली आहे..बेळगाव जिल्ह्यात २८ साखर कारखाने आहेत. त्यांनी गाळप सुरु करण्याची तयारी केली आहे. तथापि, येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांप्रमाणेच दर जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. कारखान्यांनी ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च दिला पाहिजे. काहीवेळेला तो १०० किमीपर्यंत असू शकतो. जर महाराष्ट्रातील कारखाने चांगला दर देत असतील, तर कर्नाटकातील कारखाने का देऊ शकत नाहीत?, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. .Sugarcane Price Protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले, अपेक्षित दर नाही अन् काटामारी, यड्रावकरांच्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली.दरम्यान, गेल्या काही वर्षातील साखर हंगामावर नजर टाकल्यास असे दिसून येते की उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांचा ऊस सीमेपलीकडील म्हणजेच महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना पाठवत आहेत. अधिक दर, उसाचे बिल जलद मिळणे हे यामागील कारण असल्याचे कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सांगतात. .शेतकरी संघटनांच्या मते, बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी, श्री दत्त शेतकरी, पंचगंगा या कारखान्यांना ऊस पाठवतात. .Sugarcane Rate: मराठवाड्यातील कारखान्यांनी साडेतीन हजाराचा भाव द्यावा.कर्नाटकातील शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत बिले मिळत नाहीत. त्या उलट कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने १५ दिवसांच्या आत बिले देतात. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने प्रतिटनाला ३,४०० ते ३,५०० रुपयांपर्यंत दर देतात. एवढा दर कर्नाटकातील कारखाने देत नाही. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवण्याकडे कल राहिला आहे. .कर्नाटकातील सर्व साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांएवढा उसाला दर दिला पाहिजे. आमची मागणी प्रति टन ३,५०० रुपये आहे. हा दर आम्ही घेणारच. त्यासाठी गुर्लापूर येथे ३० ऑक्टोबरला ५० हजार शेतकऱ्यांना एकत्र करुन मोठे आंदोलन केले जाईल. त्यासाठी कर्नाटकातील कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, राज्यातील मंत्र्यांनी यावेळी हजर राहिले पाहिजे.चुनाप्पा पुजारी, राज्य अध्यक्ष, कर्नाटक राज्य रयत संघ.राजू शेट्टी म्हणाले...''कर्नाटकातील कारखान्यांपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने उसाला चांगला दर देतात. यामुळे कर्नाटकातील शेतकरी त्यांचा ऊस कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना पाठवतात, हे खरं आहे. कोल्हापुरातील कारखान्यांनी कर्नाटकपेक्षा अधिक दर देणे, हे आमच्या आंदोलनामुळे झाले आहे. येथे आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. कर्नाटकातही आता ऊस दरासाठी मोठे आंदोलन उभी राहील'', असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.