Satara News : साखर कारखान्यांना मिळत असलेल्या नफ्यातील योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. तो नफा मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करावा. मागील गळीत झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये दिवाळीला पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे. .श्री. पाटील म्हणाले, की उसाला आज सोन्याचे दिवस आलेले आहेत, पण त्याचा फायदा फक्त कारखानदारांना होत आहे. एकीकडे उसाच्या रसाप्रमाणे घाम गाळणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. उसाला प्रचंड खर्च आणि कष्ट करावे लागतात. त्या मानाने त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. .Niphad Sugar Factory: ‘निसाका’ विक्रीला सभासद, कामगारांचा विरोध.ऊस साखर कारखान्यात गेल्यानंतर उसापासून भरपूर वेगवेगळे उत्पादन केले जाते. यामध्ये साखर, इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस, मळी, दारू, स्पिरिट, वीज, प्रेसमड एवढ्या मोठ्या प्रमाणात उसापासून उत्पादन होते. या सर्व उत्पादनाला सध्या बाजारामध्ये उच्चांकी भाव मिळत आहे. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये दहा टक्क्यांवरून २० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिल्यामुळे व साखरेला प्रतिक्विंटल ४५०० रुपये दर मिळू लागला आहे..Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’च्या कामगारांना १० टक्के वेतनवाढ.दारूच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. मळी, बगॅसचा भाव चौपट वाढला आहे. याचा मोठा फायदा साखर कारखानदारांना होताना दिसत असूनसुद्धा शेतकऱ्यांना मात्र कारखानदार झालेल्या फायद्यातील योग्य वाटा देत नाहीत, हे आज दिसत आहे. .सरकारही याकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने याचा विचार करून कारखान्याला मिळत असलेल्या नफ्यातील योग्य मोबदला शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मागील गळीत झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन पाचशे रुपये दिवाळीला पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी करत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.