Sugarcane Rate Issue: उसाला प्रति टन ७ हजार ५०० रुपये हमीभाव मिळेपर्यंत ऊस तोडणीसाठी कोयता लावू देणार नाही, असा निर्धार काळूस (ता. खेड) येथे झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित या मेळाव्यात ऊस उत्पादकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची तयारी दर्शविली..ज्येष्ठ शेतकरी नेते शिवाजीराव नांदखिले यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर रविवारी (ता. २०) मार्गदर्शन केले. साखर आणि इथेनॉलच्या दरात वाढ होत असताना त्याचा योग्य मोबदला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. उसाला प्रति टन ७ हजार ५०० रुपये दर मिळावा, यासाठी शासनाने दर जाहीर करेपर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस देऊ नये. गरज भासल्यास आंदोलनाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले..Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा.जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी ऊस उत्पादकांच्या हितासाठी संघटनेने सुरू केलेल्या मोहिमेला पाठिंबा देऊन उच्चस्तरीय पाठपुराव्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले..Farmers Demand: उसाला प्रति टन सहा हजार रुपये दराची मागणी.या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पवळे, संत तुकाराम कारखान्याच्या संचालिका ज्योती अरगडे, कुणबी संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब कड, रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते गजानन गांडेकर, तालुकाध्यक्ष विश्वनाथ पोटवडे, माजी चेअरमन सचिन अरगडे,.माजी सरपंच यशवंत खैरे, पत्रकार संतोष फडके, रामभाऊ वाटेकर, नवनाथ जाधव, सोमनाथ पवळे, सुरेश कौटकर, मिनीनाथ साळुंखे, विठ्ठल अरगडे, भरत अरगडे, वस्ताद दौंडकर, आप्पा दिघे, संतोष खलाटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुभाष पवळे यांनी प्रास्ताविक केले. माजी चेअरमन सचिन अरगडे यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.