Malinagar News: सोलापूर जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगामातील बेसिक रिकव्हरीनुसार १५ जानेवारीपर्यंत देय असलेली सुमारे ६४२ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. तथापि, शेतकरी संघटनांनी ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनानंतर कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची या कालावधीतील थकीत ऊसबिलाची रक्कम एक हजार कोटींच्या घरात आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही ऊसबिले मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत..जिल्ह्यात गाळप होणाऱ्या उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळण्यासाठी शेतकरी संघटनांनी संघटितपणे साखर कारखान्यांवर आंदोलने केली. त्यामुळे अनेक कारखान्यांनी प्रारंभी २८०० रुपयांदरम्यान देऊ केलेली पहिली उचल ३००० रुपयांपर्यंत वाढवली. यंदाचा गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील ३४ पैकी पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, श्री शंकर या पाच साखर करखान्यांनीच बेसिक रिकव्हरीप्रमाणे एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब हे चार कारखान्यानेच शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसार ऊसबिले देण्यात यशस्वी ठरले आहेत. बाकीचे ३० कारखाने एफआरपी देण्यातच अपयशी ठरले आहेत. तर ते कारखाने पहिल्या हप्त्यानुसार जाहीर केलेली ऊसबिले कशी देणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे..Sugarcane FRP: सोलापूर जिल्ह्यात ६४२ कोटींची ‘एफआरपी’ थकली.गाळप झालेल्या उसाचे पेमेंट १४ दिवसांत शेतकऱ्यांना अदा करणे साखर कारखान्यांसाठी कायद्याने बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ९५ लाख ६६ हजार ७६१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना एक हजार ८२५ कोटी रुपयांची ऊसबिले देण्यात आली आहेत. चारच कारखान्यांनी तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत. थकीत उसबिलासंबंधी प्रकाश अष्टेकर, प्रादेशिक साखर सहसंचालक, सोलापूर यांना संपर्क साधला. परंतु,त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही..कारखान्यांची दुटप्पी भूमिकाएकीकडे कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता २८०० ते ३०२५ रुपयांदरम्यान जाहीर केला आहे. दुसरीकडे कारखाने बेसिक रिकव्हरीनुसारची एफआरपीची आकडेवारी साखर आयुक्तालयात सादर करत आहेत. काही कारखान्यांकडे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातीलच ऊसबिले अजून थकली आहेत. साखर आयुक्तालयाने कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ऊसबिलाची वस्तुनिष्ठ माहिती समोर येण्यासाठी कारखान्यांनी बँकेत ऊसबिले जमा केल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली रक्कम पंधरवड्याच्या एफआरपी अहवालासाठी ग्राह्य धरायला हवी. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळून त्यांना ऊसबिले मिळण्यास मदत होईल..Sugarcane FRP: थकित २८ कोटींची ‘एफआरपी’ १५ टक्के व्याजासह मिळणार.आचारसंहितेमुळे आंदोलन करण्यास मर्यादा पडत आहेत. ७ फेब्रुवारीनंतर आंदोलनाचा भडका उडवून ऊसबिलाचे सर्व पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारखान्यांवर साखर जप्तीचा आदेश आणून गोडावूनमधील साखर लिलावात काढून पैसे वसूल करू.- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.आकडे बोलतात...राज्यातील थकीत एफआरपीची स्थितीगाळप हंगाम घेतलेले कारखाने ः २०२३१ डिसेंबरपर्यंतचे गाळप ः ५७३.५८ लाख मे.टनएकूण देय एफआरपी ः हजार ३३२ कोटीदिलेली एफआरपी ः १२ हजार ६२४ कोटीथकीत एफआरपी ः ४००८ कोटी१०० टक्के एफआरपी दिलेले कारखाने ः ४३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.