डॉ. गणेश कोटगिरे, डॉ. ए. डी. कडलग, जी.ई. आत्रेऊस पिकात बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझमा, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती आणि हवामानातील बदल यामुळे रोग तसेच विकृती तयार होतात. रोगामुळे उसाच्या व साखरेच्या उत्पादनात रोगाच्या प्रसार आणि तीव्रतेनुसार कमी-अधिक प्रमाणात घट येते. हंगामनिहाय ऊस रोग परिस्थिती वेगवेगळी असते तसेच वेगवेगळ्या रोगांची लागण आणि प्रमाणदेखील कमीअधिक असते. .उन्हाळी हंगामात ऊस पिकावर चाबूक काणी, गवताळ वाढ, मर, रेड रॉट, मोझॅक, यलो लीफ सिंड्रोम किंवा यलो लीफ डिसीज, लीफ स्काल्ड (पांगशा फुटणे), रटून स्टंटींग (वाढ खुंटणे) हे प्रमुख रोग आढळतात. तसेच उन्हाळ्यात लागवड केलेले ऊस पीक ताणग्रस्त राहिल्याने पावसाळ्यात या पिकात पोक्का बोंग आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे आढळून येते..Sugarcane Crop Disease: उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ रोगाचे नियंत्रण.मर हा रोग फ्यूजॅरियम सॅकॅराय या जमिनीद्वारे आणि बेण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो. जमिनीतील कांड्या पोखरणाऱ्या अळीचा (रूट बोरर) प्रादुर्भाव झाल्यास किंवा अन्य काही कारणाने जमिनीतील कांड्यास इजा झाल्यास रोगास कारणीभूत बुरशीचा शिरकाव होतो. महाराष्ट्रात कोसी ६७१ आणि को ८६०३२ या ऊस जातीत अत्यल्प प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. एकेकाळी गुजरात राज्यात या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोसी ६७१ या जास्त साखर उताऱ्याचे जातीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या जातीच्या लागवडीस प्रतिबंध करण्यात आला होता..लक्षणेदुर्लक्षित पिकात रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील कांड्यामध्ये होतो. रोगग्रस्त उसाच्या बेटातील शेंड्याकडील पाने निस्तेज दिसून हळूहळू पिवळी पडतात. सुरुवातीला पानांच्या कडा करपतात. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर रोगट बेटातील पाने व ऊस वाळतात. ऊस शेंड्याकडून वाळत जातो.वाळलेल्या उसाचा काप घेतल्यास पोकळ कांड्यात बुरशीची पांढरी वाढ आढळून येते.या रोगामुळे ऊस पोकळ होऊन रसहीन बनल्याने उसाच्या व साखरेच्या उत्पादनात घट येते.रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमिनीद्वारे तसेच रोगट बेणे, वारा व पाणी यामुळे होतो..Sugarcane Crop Disease : ऊस पिकावरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण.नियंत्रण बेणेमळ्यातील बेणे लागवडीकरिता वापरावे. नवीन लागवड करताना ऊस बेण्यास कार्बेन्डाझिम बुरशीनाशकाचे १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे १५ मिनिटे बुडवून प्रक्रिया करावी.शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था असावी. जमिनीतील कांड्या पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) प्रति एकरी २ लिटर प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून वापर करावा. रोगट बेटे खणून काढावीत. त्या ठिकाणी कार्बेन्डाझिम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड १ ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे द्रावण वापरावे, मर रोग झालेल्या उसाचा खोडवा न घेता त्या शेतात द्विदल धान्याचे पीक घेऊन फेरपालट करावी..रेड रॉट (लाल कुज) या रोगाचा प्रादुर्भाव सध्या ऊस पिकामध्ये दिसून येत नसला तरी हा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. अनुकूल परिस्थितीत या रोगामुळे ऊस पिकाचे १०० टक्केपर्यंत नुकसान होवू शकते. तसेच रसाची शुद्धता आणि साखर उतारा यामध्ये जास्त घट संभवते. कोलेटोट्रिकम फालकॅट्म या ऊस बेणेद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो..Sugarcane Crop Disease Control : उन्हाळी हंगामात ऊस पिकावरील रोगांचे नियंत्रण कसे करणार?.लक्षणेया रोगाची लक्षणे पिकाच्या पानांवर तसेच कांड्यावर दिसून येतात. पानावरील लक्षणे ः सुरुवातीस पानाच्या शिरेवर वरच्या बाजूस लालसर रंगाचे २ ते ३ मिमी लांबीचे आणि ०.५ मिमी रुंदीचे ठिपके आढळतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढत जाते. त्यानंतर पाने वाळतात. तीव्रता वाढल्यावर शेंड्याकडील सर्व पाने वाळतात. कांड्यावरील लक्षणे ः रोगट उसाची पाने वाळल्यानंतर कांड्यावर तपकिरी किंवा लालसर तपकिरी पट्टे आढळतात. कांड्या सुकतात आणि आकसून जातात. रोगग्रस्त उसाच्या कांड्याच्या आतील भागावर लाल रंगाचे अनियमित ठिपके किंवा पट्टे आढळतात. कांड्यांच्या आतील भाग पोकळ होऊन त्यामध्ये कापसासारखी आणि करड्या रंगाची बुरशीची वाढ आढळून येते. कांड्याच्या आतील भागातून तीव्र वास येतो. रोगाची तीव्रता वाढल्यावर आकसलेल्या कांड्यावर काळ्या रंगाचे ठिपके तयार होतात. रोगग्रस्त उसाची बेटे निस्तेज होऊन वाळतात..नियंत्रण बेणेमळ्यातील बेणे लागवडीकरिता वापरावे. बेण्यास कार्बेन्डाझिम बुरशीनाशकाचे १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे १५ मिनिटे बुडवून प्रक्रिया करावी. लागण केलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था असावी. रोगट बेटे खणून काढावीत. त्या ठिकाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून वापर करावा. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणात आळवणीद्वारे वापर करावा. रेड रॉट झालेल्या उसाचा खोडवा न घेणे टाळावे. त्या शेतात द्विदलवर्गीय पीक घेऊन फेरपालट करावी. पानावर रोगाची लक्षणे आढळल्यानंतर त्वरित कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक स्टीकर ०.५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात..Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट.येलो लीफ डिसीज(येलो लीफ सिंड्रोम) हा विषाणूजन्य रोग असून मावा या किडीद्वारे पसरतो. तसेच बेण्याद्वारे देखील हा रोग पसरतो. या रोगामुळे ४ ते १० टक्केपर्यंत उसाचे आणि साखरेचे उत्पादनात घट आल्याची उदाहरणे आहेत. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते..लक्षणे पीक ७ ते ८ महिन्यांचे झाल्यानंतर रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. प्रादुर्भावाच्या सुरुवातीस पानाची मध्यशिर खालच्या बाजूने पिवळी पडते. प्रथमतः ३ ते ६ क्रमांकांच्या पानांवर रोगाची लक्षणे आढळतात. कालांतराने पिवळेपणा मध्यशिरेपासून बाजूस वाढत जाऊन पूर्ण पान पिवळे पडते. हळूहळू उसाची सर्व पाने पिवळी पडतात व शेड्यांकडून वाळत जातात. रोगग्रस्त पाने शिरेलगत लालसर दिसतात. किडींचा प्रादुर्भाव, अतिथंडी तसेच अन्नद्रव्यांचा ताण आदी बाबींमुळे रोगाची तीव्रता वाढते..नियंत्रणाचे उपाय उती संवर्धित रोपांपासून बेण्याची वाढ केलेल्या बेणेमळ्यात रोगाचे नियंत्रण होते. म्हणून अशा बेणेमळ्यातील बेणे लागवडीसाठी घ्यावे. पिकावर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) ३ मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणीद्वारे वापर करावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.