Sangli News: यंदा सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस लागवडीला मोठे अडथळे निर्माण झाले. शेतशिवारात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने लागवडीत विस्कळीतपणा आला, तरीही प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचा वेग टिकवून ठेवत मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर लागवड पूर्ण केली आहे. .डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तब्बल ३३ हजार ३१० हेक्टर ऊस लागवड पूर्ण झाली असून त्यातील २५ हजार ४४७ हेक्टर क्षेत्र ‘आडसाली’ लागवडीचे आहे. पुढील १५ दिवसांत ‘सुरू’ लागवड सुरू होणार असून ती किती प्रमाणात होईल, याकडे कृषी विभागाचे लक्ष आहे..Sugarcane Cultivation: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर उसाची लागवड.दुष्काळी आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्यांमध्येही यंदा मुबलक पाऊस आणि सिंचन योजनांचे पाणी उपलब्ध झाल्याने ‘सुरू’ व ‘पूर्वहंगामी’ ऊस लागवड वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांना सध्या पुरेसा ऊस उपलब्ध असून पुढील वर्षी ऊस लागवड क्षेत्रात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अनेक साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने यंदाचा गळीत हंगाम १२० ते १३० दिवस चालण्याचा अंदाज वर्तवला जात आहे..यंदाच्या हंगामात १२ मेपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. ऑक्टोबर २०२५ अखेर १०९ टक्के पाऊस झाल्याने काही ठिकाणी लागवड उशिरा झाली. पूर हंगामातील ऊस लागवड सामान्यतः ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते; मात्र अतिवृष्टीमुळे या हंगामातही लागवडीत विलंब झाला. सध्या ‘आडसाली’ आणि ‘पूर्वहंगामी’ लागवड जवळपास पूर्णत्वास आली असून ‘सुरू’ हंगामातील लागवड पुढील पंधरवड्यात सुरू होणार आहे. शेतकरी तयारीला लागले आहेत..Sugarcane Farming: सुरु ऊस लागवडीचे तंत्र.ऊस लागवड क्षेत्रनिहाय तपशील (हेक्टरमध्ये)आडसाली -२५,४४७पूर्वहंगामी -५,६६२सुरू -पुढील १५ दिवसांत सुरूखोडवा -२,२०१.तालुकानिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये)मिरज २,४७४जत २,४०२खानापूर ४,७८१वाळवा ५,१३६तासगाव २,३४३शिराळा १,१३०आटपाडी ९८५कवठेमहांकाळ १,०३७पलूस ६५३कडेगाव ८,३८९एकूण ३३,३१०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.