Kolhapur News: आजरा तालुक्यात ऊस लागणीची धांदल उडाली असून, शेतकरी कुटुंबे शेतातच तळ ठोकून आहेत. मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी चढ्या दराने मुजरी देऊन लागण तातडीने उरकून वाफसा साधण्याच्या प्रयत्नात आहेत. तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत १९०० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे..गेल्या काही वर्षांत तालुक्यात पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तीन वर्षांत तालुक्यात आंबेओहळ, उचंगी व सर्फनाला प्रकल्प झाल्यानंतर पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उसाला मिळणारा चांगला दर, जवळच असणारे साखर कारखाने आणि कष्ट कमी असल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी साडेचार हजार हेक्टरपर्यंत असलेले ऊसक्षेत्र सध्या सात हजार हेक्टरवर पोहोचले आहे..Sugarcane Cultivation: सांगली जिल्ह्यात डिसेंबरअखेर६३ हजार हेक्टरवर ऊस लागवड.तालुक्यात अधिकतर सुरूची लागवड मोठ्या प्रमाणात होते. आडसाली लागण होत नाही. पूर्वहंगामी लागवड थोड्या प्रमाणात होते. डिसेंबर अखेरनंतर सुरू हंगामात लागवड केली जाते..Sugarcane Cultivation: पुणे विभागात ऊस लागवड २.९८ लाख हेक्टरवर.तालुक्यात सध्या १९०० हेक्टरवर या हंगामात लागवड झाली आहे. साखर कारखान्याला ऊस घालण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. रान मोकळे झाल्यावर लागवड करता येणे शक्य असल्याने शेतकऱ्यांची लवकरात लवकर ऊस पाठविण्याचा प्रयत्न आहे. सध्या तालुक्यात १०००१ या नवीन जातीचे वाण लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पसंत केल्याचे दिसते. त्याचबरोबर ८६०३२ या वाणाबरोबर अन्य नवीन संकरित जातीची लागवड शेतकरी करीत आहेत. यंदा उसाचे लागण क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे कृषी विभाग व शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले..दृष्टिक्षेपात..तालुक्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र ः ७००० हेक्टर (अंदाजे)सुरू हंगाम लागवड ः १९०० हेक्टरउसाचा खोडवा ः २६०० हेक्टर.हवामानातील बदल, उत्पादन खर्च वाढ ही ऊस पिकासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पाच फुटांवरील सरी, ठिबक सिंचन आणी ऊस पाचट व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांनी भर द्यायला हवा. यामुळे उसाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.- दिनेश शेटे, कृषी अधिकारी पंचायत समिती, आजरा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.