राज्यातील २०२५-२६ हंगामातील ऊस गाळपाने घेतला वेगयंदा १९३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरु२८ डिसेंबर २०२५ पर्यंत ५१५.३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप४४७.८२ लाख क्विंटल साखर उत्पादनसरासरी साखर उतारा ८.६९ टक्केकोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक १०.२३ टक्के.Sugarcane Crushing Season In Maharashtra: राज्यातील २०२५-२६ हंगामातील ऊस गाळपाने वेग घेतला आहे. यंदा १९३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरु असून, त्यांनी २८ डिसेंबर २०२५ पर्यंत ५१५.३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्यातून त्यांनी ४४७.८२ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. राज्यातील सरासरी साखर उतारा ८.६९ टक्के एवढा आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सर्वाधिक १०.२३ टक्के आहे. तर सर्वात कमी उतारा नागपूर विभागाचा ६.८८ टक्के एवढा आहे. .साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण ऊस गाळपात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुणे विभागातील एकूण ३० कारखान्यांचा हंगाम सुरु असून, त्यांनी २८ डिसेंबरपर्यंत सर्वाधिक १२४.८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. यातून त्यांनी १११.४१ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा साखर उतारा ८.९३ टक्के एवढा आहे. .Sugarcane Transport Rule: ऊस काटामारी रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय.सोलापूर विभागातील १५ सहकारी आणि २८ खासगी मिळून एकूण ४३ कारखान्यांचा हंगाम सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत १०७.४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करत, ८३.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतल आहे. सोलापूर विभागाचा साखर उतारा ७.८१ टक्के आहे. .Sugarcane Transport: धोकादायक ऊस वाहतूक केल्यास होणार कारवाई.अहिल्यानगर विभागातील २६ कारखान्यांनी आतापर्यंत ६१.९२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्यांनी ५०.५८ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. त्यांचा साखर उतारा ८.१७ टक्के आहे. .छत्रपती संभाजीनगर विभागातील २२ कारखान्यांनी ४९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करत, ३५.९३ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर साखर उतारा ७.३३ टक्के एवढा आहे.नांदेड विभागातील २९ कारखान्यांनी ५२.११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून, ४४.२१ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.