ऊस पीक उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापरएआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी १८,२५० रुपये अनुदान६,७५० रुपये कारखाने भरतीलयामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मिळतील.Sugarcane AI Farming: ऊस पीक उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जात आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (VSI) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ऊस पीक उत्पादनासाठी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी अनुदान प्रति हेक्टरी ९,२५० रुपयांवरून १८,२५० रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात ५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे..याबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, व्हीएसआय हे एक महत्वाचे संशोधन केंद्र आहे. यंदा साधारण ५ हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ९,२५० रुपयांवरून १८,२५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीचे ६,७५० रुपये कारखाने भरतील. यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मिळतील..जे उसाचे रोप ३ रुपयाला होते; त्याची किंमत आता २ रुपये केली आहे. त्यात प्रति रोपाला १ रुपये अनुदान देण्याचे ठरविले आहे. साधारणत: हेक्टरी बारा हजार त साडेबारा हजार रोपे लागतात. त्याचा विचार केला तर जवळपास २४ ते २५ हजार किंमत होते. ती शेतकऱ्यांना भरायची आहे. त्यासाठी स्वत: ठिबक सिंचनाची सोय करावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला आहे..AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवा .प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. तर यासाठी ५ हजारांपेक्षा जास्त शेतकरी आले तर त्यांच्याबाबत कृषी मंत्रालय निर्णय घेईल, असे अजित पवार म्हणाले..ते पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील नियामक मंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. यावेळी साखर अभियांत्रिकी आणि अक्षय ऊर्जा, साखर तंत्रज्ञान, मद्यार्क तंत्रज्ञान, तसेच कृषी आणि ऊस शेती क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर या विषयांवर चर्चासत्र झाले. यावेळी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. .Sugarcane Rate: ‘माळेगाव’चा अंतिम दर ३४५० रुपये .व्हीएसआयच्या माहितीनुसार, एआय आधारित ही योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ८४७ शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केली होती. आता पाच हजार शेतकऱ्यांना व्हीएसआयकडून प्रति हेक्टरी १८,२५० रुपये अनुदान मिळणार आहे. .ऊस शेतीत एआयचा वापरऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञान बसविण्यासाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये खर्च येतोवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने यंदा हेक्टरी १८,२५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय उर्वरित ६,७५० रुपये कारखाने भरणार आहेतया योजनेतर्गंत ऊस लागवड करताना ठिबक सिंचन असणे आवश्यक आहेऊस शेतीमध्ये एआयच्या वापराने उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.