Nandurbar News : खानदेशात ऊस लागवड वाढत आहे. अनेकांनी कापूस, केळीऐवजी उसाची लागवड केली आहे. पण गेल्या पाच वर्षांपासून खांडसरी, कारखाने यांच्याकडून उसाला हमीभाव मिळत नसून, यंदा दर उत्पादन खर्चानुसार किंवा चार हजार रुपये प्रतिटन एवढा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. .पुढील महिन्यात ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्याची तयारी कारखान्यांनी सुरू केली आहे. खानदेशात नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १६ हजार ५०० हेक्टरवर ऊस पीक आहे. शहादा तालुक्यात १२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. .Sugarcane FRP Dues : अठ्ठावीस कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई.चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड वाढत आहे. अनेक जण पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून उसाला प्राधान्य देत आहेत. ऊस हे बारमाही पीक असून, त्यावर खते, बियाणे, लागवडीचा खर्च, तणनियंत्रण, ठिंबक सिंचन आदी खर्चही अधिक करावा लागत आहे..महागाईचा फटकाशेतीसंबंधीच्या महागाई वाढलेली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. दर महिन्यास खताचे दर वाढतात. डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चदेखील दीडपटीने वाढला आहे. रोगराई वाढत आहे. त्यामुळे किडनाशकांचा खर्चही आहे..Sugarcane FRP Dues : सोलापूर जिल्ह्यात ४२ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकित.हमीभाव, एफआरपी मिळेनात्यात शेतमालास योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सोयाबीन, कापूस, कांदा, केळी, कलिंगड, उडीद आदी कुठल्याही शेतमालास हमीभाव, चांगला दर नाही. पुढे गळीत हंगाम सुरू होणार आहे. मागील पाच ते सात वर्षांपासून उसाचा दर कमीच आहे. तुलनेत ऊस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. याचाही विचार आणि अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत..पावसाचा लहरीपणालहरी हवामान, पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक समस्याही आहेत. यंदा मध्यंतरी पावसाची तूट नंदुरबारात होती. धुळे, जळगावात जुलैत बरा पाऊस होता. नंतर सर्वत्र कमी पाऊसमान होते. तर ऑगस्टच्या मध्यानंतर सर्वत्र पाऊस आला. पण या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड आदी भागास अधिकचा फटका बसला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.