Congress Protest Over Sugar Prices: साखरेच्या दरवाढीवरुन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. साखरेच्या दरातील अचानक मोठी वाढ आणि महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या मुद्द्यांवरून छत्तीसगड काँग्रेसकडून शुक्रवारी राज्यभर ‘चीनी सत्याग्रह’ आंदोलने करण्यात आली. .सर्व जिल्ह्यांत आंदोलने करण्यात आली. रायपूरमध्येही निदर्शने करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसच्या राज्य संपर्क विभाग प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी दिली. छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी सांगितले की, मोदी सरकारचे धोरण जनतेविरोधी आहे. जास्त कर आकारणी हे वाढलेल्या महागाईचे प्रमुख कारण आहे. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यांचे जगणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस 'चिनी सत्याग्रहा'च्या माध्यमातून जनतेसाठी आवाज उठवत आहे..Sugar Season: गाळप हंगाम लवकर चालू करा: केंद्र सरकार.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन दुकानांत आता साखर दिली जात नाही. यामुळे सण, उत्सव तसेच रोजच्या वापरासाठी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना खुल्या बाजारातून प्रति किलो ६० ते ७० रुपये दराने साखर खरेदी करावी लागत आहे, असा दावा बैज यांनी केला..Sugar Stock Limit: साखर साठवणुकीबाबत व्यापाऱ्यांवर निर्बंध कडक.बस्तर आणि सरगुजा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हरभरा आणि गुळाचा तुटवडा आहे, असे सांगत त्यांनी या परिस्थितीचा फायदा साठेबाज उठवत असल्याचे नमूद केले. रेशन दुकानातून साखरेचा पुरवठा तत्काळ पुन्हा सुरु करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा गल्लीपासून ते विधानसभेपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात रेशन दुकानांत साखर, मीठ, तांदूळ, हरभरा आणि गूळ मिळत होता, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे..साखरेचे दर कमी होऊ लागलेसाखरेच्या दरातील अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामुळे साखरेचे दर आता हळूहळू कमी होऊ लागले आहेत. गेल्या आठडाभरात साखरेच्या किरकोळ दरात ३.८५ टक्के घसरण झाली. यामुळे किरकोळ दर ६२ रुपयांपर्यंत खाली आला. आठवडाभरापूर्वी साखरेचा किरकोळ दर प्रति किलो ६५.०८ रुपयांवर होता. पण अजूनही सर्वसामान्यांना आधीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कारण महिनाभरापूर्वी सरासरी किरकोळ दर ४९.३३ रुपये होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.