Solapur News : यंदाच्या २०२५-२६ च्या हंगामात ऊस गाळप परवान्यासाठी आजपासून (ता.१) ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. साखर कारखान्यांना त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे..विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तांनी परिपत्रक काढून निश्चित कार्यक्रमही कारखान्यांना दिला आहे..Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीस गती.साखर कारखान्यांना परवाना शुल्क व सुरक्षा अनामत रकमेचा भरणा करावा लागणार आहे.२०२४-२५ मधील ऊस गाळपावर प्रतिटन पाच रुपयांप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कारखान्यांना जमा करावा लागणार आहे. तसेच मागील हंगामात कारखान्यांनी केलेल्या गाळपावर प्रतिटन ५० पैशांप्रमाणे साखर संकुल निधी द्यावा लागणार आहे..Sugarcane Crushing Season : कर्नाटकचा ‘ऊस’ चोरण्याचा डाव.सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भागभांडवल,कर्ज व हमी शुल्क वसुलीसाठी प्रचलित पद्धतीप्रमाणे साखरेवर टॅगिंगद्वारे शासकीय वसुली प्रतिक्विंटल ५० रुपये व प्रतिक्विंटल २५ रुपयांप्रमाणे साखर विक्रीच्या रक्कमेतून वसूल करून शासकीय कोषागारात जमा करण्यास सांगण्यात आले आहे..राज्यात यावर्षीचा हंगाम २०२५-२६ करिता सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त करून घेतल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्री समितीमधील निर्णय चालू वर्षीच्या हंगामाकरिता लागू राहतील, असेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.