Kolhapur News: यंदाचा साखर हंगाम संपत आला, तरी केवळ ४१ कारखान्यांनी जानेवारी अखेर एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. हंगाम सुरू असलेल्या २०५ साखर कारखान्यांपैकी तब्बल १६४ कारखाने अद्यापही एफआरपीची रक्कम देण्यासाठी झगडत आहेत. या कालवधीअखेर कारखान्यांकडून ४२५२ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे..साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ पर्यंत ७२४.७४ लाख टन ऊस गाळप करण्यात आले आहे. या उसासाठी देय असलेली एकूण एफआरपी (वाहतूक व हाताळणीसह) २८,०८३ कोटी रुपये इतकी आहे. यापैकी २३ हजार ८३१ कोटी रुपये प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्यात आली आहे..Sugarcane FRP: सोलापूर जिल्ह्यात थकली ६४२ कोटींची एफआरपी.४१ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली. ७५ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिली. ४४ कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. ४५ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. एकूण १६४ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपी देणी प्रलंबित असल्याचे चित्र आहे..यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत गतीने साखर निर्मिती झाली. साखरेचे उत्पादन वेगात झाले असले, तरी साखरेला उठाव नसल्याने साखरेच्या दरातही फारशी वाढ झाली नाही. अत्यंत धीमी मागणी असल्याने दर अपवाद वगळता स्थिर राहिले, यामुळे कारखान्यांना साखर विक्रीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. केंद्रानेही साखर व इथेनॅालच्या दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतले नाहीत, यामुळे कारखाना पातळीवर आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम वेळेत देण्यावर होत असल्याची कबुली काही कारखानदारांनी दिली..Sugarcane FRP Pending: ऊस उत्पादकांचे ४१२ कोटी कारखान्यांकडे थकित.उद्दिष्टपूर्ती नाही झाली तर शेवटच्या टप्प्यातील एफआरपीची शंभर टक्के रक्कम तातडीने देणे शक्य नसल्याची भीतीही काही कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. अनेक कारखाना प्रतिनिधींनी केंद्रीय पातळीवर एमएसपी वाढीबाबत प्रयत्न केले पण केंद्राने केवळ आश्वासने देत या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांची देणी देण्यावर होत कारखाना प्रतिनिधींनी स्पष्ट केले..शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणामशिवारामध्ये मात्र शेवटच्या टप्प्यातील ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादकांनी तोडणी यंत्रणांची मनधरणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. काहीही कारणे सांगून या यंत्रणा ऊस उत्पादकांकडून रक्कम उकळत आहेत यामुळे उसाची तोड करून तो कारखान्यांना पाठविताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. अगोदरच तुऱ्याने हैराण, त्यात ऊस तोडणीसाठी विनवण्या आणि यात भरीस भर म्हणून एफआरपीची अर्धवट रक्कम मिळत असल्याने उस उत्पादकांत संतापाची भावना व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.