Sugar Market: घटत्या साखरदरामुळे साखर उद्योग चिंतेत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकारमंत्री, तसेच मंत्रिगटाचे अध्यक्ष अमित शाह व केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांना सविस्तर निवेदने दिली असून त्यांच्या समक्ष भेटीसाठी वेळ मागितली आहे.