देशाने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे ध्येय साध्य केले आहेआता साखर उद्योगाची पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २७ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची विनंतीइथेनॉल खरेदीचे दर स्थिर राहिल्याने आर्थिक दबाव निर्माण झाल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे.Ethanol Blending: देशाने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे ध्येय साध्य केले आहे. आता साखर उद्योगाने सरकारकडे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २७ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे. जेणेकरून जैवइंधन निर्मितीच्या अतिरिक्त क्षमतेचा पूर्णपणे वापर होईल. .साखर उद्योगाने इथेनॉल उत्पादनांसाठी सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांची दरवर्षी ९०० कोटी लिटरपेक्षा अधिक उत्पादन क्षमता आहे. यामुळे आम्ही २० टक्क्यांच्या पलीकडे जाऊन २७ टक्क्यांपर्यंत आणि त्याहून अधिक मिश्रणासाठी इथेनॉल पुरवठा करण्याची आमची तयारी आहे, असे इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Isma) चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी म्हटले आहे..Ethanol Production: इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ४५ हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न : नितीन गडकरी .हा वेग कायम ठेवणे आणि उत्पादन क्षमतेचा चांगला वापर करणे तसेच लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्च, स्थिर उत्पन्नाची खात्री मिळण्यासाठी एक ठोस स्वरुपाचा, कालबद्ध राष्ट्रीय इथेनॉल मोबिलिटी रोडमॅप अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे..गेल्या तीन वर्षांपासून बी-हेवी मोलॅसिसच्या आणि उसाच्या रसापासूनच्या इथेनॉल खरेदीचे दर स्थिर आहेत. यामुळे आर्थिक दबाव निर्माण झाला असल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे आहे..Ethanol Blending: इथेनॉल मिश्रणाने साखर कारखान्यांना नवसंजीवनी; अमित शहा.इस्माचे बल्लानी यांच्या मते, इथेनॉल उद्योगाची २०२५-२६ वर्षात १७,७६० दशलक्ष लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची क्षमता आहे. तर तेल विपणन कंपन्यांना दरवर्षी १०,५०० दशलक्ष लिटर इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे, या उद्योगाची २७ टक्के इथेनॉल मिश्रणासाठी पुरवठा करण्याची पूर्ण तयारी आहे..एकूण उत्पादनापैकी सुमांरे ४,७१० दशलक्ष लिटर इथेनॉलची निर्मिती उसाच्या मळीपासून केली जाते. तर १३,०४० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त इथेनॉल धान्यापासून तयार केले जाते. .२० टक्के मिश्रणाव्यतिरिक्त निश्चित आराखडा नसल्याने इथेनॉलच्या उत्पादन क्षमतेचा कमी वापर होईल. ज्यामुळे या उद्योगाचील गुंतवणूक वाया जाईल. कारखान्यांच्या उत्पन्नात घट होऊ शकते. तसेच भविष्यातील जैवइंधन उत्पादनात मंदी येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे..तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन घेणाऱ्या उद्योगांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्याच्या २० टक्क्यांवरून वाढविण्याची आणि या क्षेत्रातील नवीन गुंतवणूक थांबवण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे..सध्या एकूण ४०० युनिट्सकडून इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. त्यात सुमारे २५० युनिट्स तांदूळ आणि मक्यापासून होणाऱ्या उत्पादनावर आधारित आहेत. उर्वरित युनिट्सकडून उसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती केली जाते..इथेनॉल उत्पादनाचा शेतकऱ्यांना काय फायदा?एका अधिकृत नोंदीनुसार, इथेनॉल मिश्रण उपक्रमामुळे २०१४-१५ पासून जुलै २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. त्याशिवाय, देशात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात केले जाते. यामुळे इथेनॉल उत्पादनामुळे परकीय चलनाच्या बाबतीत १.४४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक बचत झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.