Global Sugar Market: साखर उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर तर वापरात प्रथम क्रमांकावरील भारत देशाला आयातीवर पण अधिक काळ अवलंबून राहणे परवडणारे नाही. मुळात साखर उद्योग हा वाढता उत्पादन खर्च, साखरेला मिळणाऱ्या कमी दरामुळे मागील अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. .त्यात या वर्षीचा गळीत हंगाम त्यांची कसोटी पाहणाराच ठरणार, यात शंका नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमी ऊस उपलब्धतेमुळे चालू गळीत हंगाम हा कमी कालावधीचा पर्यायाने कमी गाळपाचा असणार आहे. हंगाम कमी काळ चालला म्हणजे साखरेचे उत्पादन घटते आणि उत्पादन खर्च मात्र वाढतो. या वर्षी देशात साखर उत्पादनात पाच टक्के घट होऊन ते २६५ लाख टनांवर स्थिरावणार असल्याचा अंदाज ‘इस्मा’ने (इंडियन शुगर ॲण्ड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) व्यक्त केला आहे. साखर उत्पादनाची मागील दशकातील ही नीचांकी पातळी असेल. देशातील साखर उत्पादनातील या घटीकडे केवळ या हंगामापुरते (२०२६-२७) न पाहता पुढील गळीत हंगामात (२०२७-२८) परिस्थिती यापेक्षा भीषण असेल, असे जाणकारांचे मत आहे. पुढील गळीत हंगामात साखर उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, हे विचारात घेऊन उत्पादक, कारखानदार आणि सरकारने देखील सावध पावले उचलायला हवीत..Sugar Production: देशातील साखर उत्पादन दशकभरातील नीचांकी पातळीवर; महाराष्ट्रात १२ टक्के घट अपेक्षित.कमी गाळपाचा पहिला फटका उत्पादकांना आणि दुसरा कारखान्यांना बसणार आहे. उसाचे कमी उत्पादन आणि उताराही कमी असल्याने उत्पादकांना कमी पैसा मिळेल. बदलत्या हवामान काळात कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे दिवसेंदिवस ऊस लागवड क्षेत्र घटतच जाणार आहे. अशा वेळी कमी क्षेत्रात, कमी पाण्यावर ऊस उत्पादकता वाढविणे हाच एकमेव पर्याय उत्पादकांपुढे उरतो. ऊस हे पीक ठिबक सिंचनावर घेतले तर पाण्याची बचत आणि उत्पादकतेत वाढ होते. .आता तर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्राने कमी पाणी, कमी खर्चात एकरी १०० टनांवर ऊस उत्पादनाचे प्रयोग यशस्वी होत आहेत. भविष्यात उसाची उत्पादकता वाढवून राज्यात, देशात साखरेचे उत्पादनदेखील वाढवायचे असेल तर अशा प्रयोगांचा वापर वाढवावाच लागणार आहे. साखर कारखाने तसेच राज्य सरकारने अशा तंत्रज्ञानाद्वारे आपल्या परिसरात ऊस उत्पादकता पर्यायाने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करायला हवे..Sugar Production Forecast: भारतातील साखर उत्पादन घटणार! २० वर्षांतील सर्वांत कमी साखरसाठा राहण्याचा यूएसडीएचा अंदाज.गेल्या हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी ३२ लाख टन साखरेचा वापर होऊनही २८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या वर्षी ते २६५ लाख टनांवर स्थिरावले तर आपल्या गरजेपेक्षा (२९० लाख टन) उत्पादन कमी राहणार आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे पुढील गळीत हंगामाच्या तोंडावर (सप्टेंबर-ऑक्टोबर २०२७) केवळ २० लाख टन साखर हाती असेल, ज्यातून देशाची जेमतेम महिनाभराची गरज पूर्ण होऊ शकेल..त्यामुळे आयातीशिवाय सरकारला काही पर्याय दिसत नाही. देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढविण्यासाठी चालू साखर हंगामात किमान २० लाख टन साखरेची आयात करावी लागण्याची शक्यता आहे. देशात मागणी - पुरवठ्यात फार तफावत राहू नये, त्यातून दर वाढू नयेत म्हणून सरकारचा भर आयातीवर असतो. .परंतु साखर उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर तर वापरात प्रथम क्रमांकावरील भारत देशाला आयातीवर अधिक काळ अवलंबून राहणे परवडणारे नाही. जागतिक बाजारात सध्या साखरेचे दर चढेच (प्रति किलो ४९ रुपये) आहेत. भारताकडून साखरेची मागणी वाढली, आयात वाढली की आंतरराष्ट्रीय बाजारात दर वधारून असतात. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारची कसरत होणार आहे. देशात शीतपेये, आइस्क्रीम, चॉकलेट, बिस्कीट तसेच इतर मिठाईतील मोठ्या कंपन्यांकडून साखरेला मागणी जास्त असते. अशा वेळी प्रक्रियेसाठीच्या साखरेला वेगळा दर आणि घरगुती वापरासाठीच्या साखरेला वेगळा दर या पर्यायाचा विचार सरकारने केल्यास सर्वसामान्य ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळू शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.