Sugar Industry: साखर उद्योगाकडे ‘जीडीपी’चा तीन टक्के वाटा उचलण्याची क्षमता
Farmers Income: साखर उद्योग देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरत असून, या उद्योगामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना तब्बल ६० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. उद्योगाने उपपदार्थ निर्मितीवर भर दिल्यास जीडीपीत साखर क्षेत्राचा वाटा तीन टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले.