Jalna News: जालना जिल्ह्यात चालू गळीत हंगामासाठी यंदा सुमारे ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी एकूण २१ लाख ६० हजार ३०३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून १६ लाख ४२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ७.४१ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे..जिल्ह्यातील गोदापट्टा परिसरात उसाची सर्वाधिक लागवड होते. यंदा समर्थ युनिट एक, समर्थ युनिट दोन आणि समृद्धी शुगर्स या तीन साखर कारखान्यांसह इतर जिल्ह्यातील कारखानेही ऊस उचलण्यासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी गोदापट्टा परिसरातून ऊस उचलण्यास सुरवात केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण पाच साखर कारखाने सुरू आहेत..Sugar Production: ‘नॅचरल शुगर’मध्ये नऊ लाख १११ व्या साखर पोत्याचे पूजन.अंबड तालुक्यातील समर्थ युनिट एक कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ६३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ९० हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. घनसावंगी तालुक्यातील समर्थ युनिट दोनने ३ लाख ३ हजार ५३० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ७९ हजार ६२५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. .अंबड तालुक्यातील समर्थ युनिट एक कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ६३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ९० हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. घनसावंगी तालुक्यातील समर्थ युनिट दोनने ३ लाख ३ हजार ५३० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ७९ हजार ६२५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे..Sugar Production: कोल्हापूर विभागात साखरेचे एक कोटी ८६ लाख क्विंटल उत्पादन.याशिवाय, घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर्सने ४ लाख ५८ हजार २४१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ४ लाख ७१ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने १ लाख ४७ हजार १५६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख २९ हजार ७०० क्विंटल साखर तयार केली आहे. परतूर येथील श्रद्धा एनर्जी या कारखान्याने ५ लाख ८८ हजार ३७५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख २९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे..मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऊस संपणारपश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये ऊस उचलण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील कार्यक्षेत्रातील तीन साखर कारखान्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील कारखान्यांनाही ऊस जात आहे. शेतकरी ऊसतोड आल्यानंतर नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना ऊस घालतात..‘रामेश्वर’चा साखर उतारा सर्वाधिकरामेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा २१.८ टक्के इतका असून, तो सर्वाधिक आहे. त्यानंतर श्रद्धा एनर्जीचा १०.४४ टक्के, समृद्धी शुगर्सचा १०.०४ टक्के, समर्थ युनिट एकचा ९.०४ टक्के, तर समर्थ युनिट दोनचा ९ टक्के साखर उतारा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.