Pune News: शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे शासन, अशी टिमकी राज्य सरकार वाजवत असताना दुसऱ्या बाजूला विविध कृषी योजनांच्या निधीच्या मागणी प्रस्तावांकडे पद्धतशीरपणे टाळाटाळ केली जात आहे. ‘मार्च एण्ड’च्या आत दोन हजार कोटींचा निधी न मिळाल्यास शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी ताटकळत राहावे लागणार आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. .२५ हजार कोटींची कृषी समृद्धी योजना राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केली. मात्र नियोजनाप्रमाणे पहिल्या वर्षाचा निधी दिला नाही. त्यामुळे या निधीच्या अपेक्षावर कृषी विभागाने अनुदान वाटपाचे केलेले नियोजन पुरते कोलमडले आहे. शेतकऱ्यांना पूर्वसंमतिपत्रे वाटण्याची प्रक्रियादेखील आता बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात कृषी विभागाने चार हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. परंतु सरकारने ही मागणी विचारात घेतली नाही..Irrigation Project Funds: सिंचन प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी .त्यामुळे अनुदान वाटपाच्या कोणत्याही नव्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे थांबविण्यात आले आहे. आता या महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांकडे कृषी विभागाचे लक्ष लागून आहे..Farmer ID Issue: अमरावतीत युनिक फार्मर आयडीचा खोळंबा.‘‘दोन हजार कोटींहून अधिक निधी मिळण्याचे प्रस्ताव आम्ही पाठवले आहेत. निधी वेळेत न मिळाल्यास अनुदान वाटपाचे नियोजन पुन्हा कोलमडेल. पुरवणी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांना आणखी ४-५ महिने अनुदानासाठी वाट पाहावी लागेल. केंद्र सरकारने राज्यातील विविध कृषी योजनांसाठी १५१८ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातील ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तसेच, राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी २९११ कोटी रुपये खर्च झाले आहेत,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.....या योजनांसाठी कृषी विभागाने मागितला निधीयोजनेचे नाव अत्यावश्यकअसलेला निधीकृषी यांत्रिकीकरण योजना १३०० कोटी रुपयेसूक्ष्म सिंचन योजना ८०७ कोटी रुपयेस्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी १३७ कोटी रुपयेगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ४० कोटी रुपयेपांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना ९० कोटी रुपयेतालुका बीजगुणन केंद्र वेतनवाटप १८ कोटी रुपयेनिविष्ठा चाचणी प्रयोगशाळा बळकटीकरण ६ कोटी रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.