Farmer Issue: कळमेश्वर औद्योगिक परिसरातील एशियन केमिकल्स कंपनीमध्ये शासन अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाई झाली असली, तरी खत पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांवर अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने संशय आणि नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाईला विलंब होत असल्याची चर्चादेखील रंगू लागली आहे..कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कळमेश्वर येथील एशियन केमिकल्स कंपनीत मेलेनिन व रेझीन निर्मितीसाठी शासन अनुदानित युरियाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तालुका गुण नियंत्रण निरीक्षक प्रशांत राऊत यांनी १२ मार्च रोजी पहाटे छापेमारी केली. या कारवाईदरम्यान कंपनीच्या परिसरात मजुरांकडून बॉयलरमध्ये मोठ्या प्रमाणात अनुदानित युरिया टाकला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. त्याचवेळी घटनास्थळावरून सुमारे १०० पोती युरिया जप्त करण्यात आला..Subsidized Urea Misuse: अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.या प्रकरणी कंपनीचे संचालक आसिफ सलाट यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या युरियाचा पुरवठा करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर अद्याप निर्णायक कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीत समोर आलेल्या सहा कृषी सेवा केंद्र चालकांची चौकशी सुरू असून त्यांच्या व्यवहारांची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे..Fertilizer Linking: खतांचे लिकिंग सुरूच, युरिया विक्री गैरव्यवहार प्रकरणी ५३४ केंद्रांचे परवाने निलंबित.दरम्यान, संबंधित विक्रेत्यांनी आपण नियमाप्रमाणेच खत विक्री केल्याचा दावा केला आहे. काही शेतकऱ्यांनी खरेदी केलेले अनुदानित खत पुढे कंपनीला विकले असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करताना तपास यंत्रणेसमोर गुंतागुंत वाढली आहे..चौकशीदरम्यान एशियन केमिकल्स कंपनीचे संचालक आसिफ सलाट यांनी कळमेश्वर तालुक्यातील प्रगती, राव, महालक्ष्मी तसेच सावनेर तालुक्यातील न्यू आदर्श, सतनाम ॲग्रो ट्रेडर्स (खापा) आणि यश कृषी सेवा केंद्र येथून अनधिकृतरीत्या खत खरेदी केल्याचे कबूल केल्याची माहिती समोर आली आहे.एकीकडे शेतकऱ्यांना हंगामाच्या तोंडावर खत टंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे अनुदानित खताचा औद्योगिक वापर होत असल्याचा प्रकार उघड झाल्याने संतापाची लाट उसळली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.