Jalna News: गरजूंनाच शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, याकरिता राज्य शासनाने मोफत धान्य वाटप योजनेतील अपात्र लाभार्थींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यात प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक तसेच विहित मर्यादेपेक्षा जास्त शेती असलेल्या कुटुंबांची पडताळणी सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील सुमारे ९२० कुटुंबांचा मोफत धान्याचा कोटा बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे..पुरवठा विभागाकडून सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक सधन कुटुंबे अजूनही स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात किंवा मोफत धान्य उचलत असल्याचे समोर आले आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा जे करदाते आहेत, त्यांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे..Ration Eligibility Issue: ‘एफपीसी’चे संचालक असल्याने अल्पभूधारक रेशनसाठी ‘अपात्र’?.‘क्लीनअप ड्राइव्ह’अंतर्गत पडताळणीशासनाने अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींची पडताळणी करण्यासाठी ‘क्लीनअप ड्राइव्ह’ मोहीम सुरू केली आहे. यात प्राप्तिकरदाते, चारचाकीधारक तसेच बागायतदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार, वार्षिक ४४ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाच मोफत धान्याचा लाभ मिळू शकतो..Ration Shop: स्वस्त धान्य दुकानात आता मकाही मिळणार.यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यातील अपात्र लाभार्थींची यादी शासनाकडून तहसील कार्यालयास प्राप्त झाली असून, संबंधित शिधापत्रिका ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रक्रिया पूर्ण होताच संबंधितांचा धान्य कोटा बंद होणार आहे..मंठा तालुक्यातील रेशन लाभार्थींची पडताळणी सुरू असून, शासनाच्या आदेशानुसार जे लाभार्थी निकषात बसत नाहीत, त्यांचे धान्य पुढील महिन्यापासून बंद केले जाईल. गरजू आणि पात्र कुटुंबांना त्यांचा हक्काचा लाभ मिळावा, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आयकर भरणारे किंवा सधन असूनही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.विकास राजपूत, पुरवठा नायब तहसीलदार, मंठा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.