Government Scheme: केंद्र शासनाच्या सहकार्याने यंदा देशातील विविध राज्यांत कापूस उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने कापूस क्रांती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निवड झालेल्या शेतकरी गटांना अनुदानित कपाशी बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, काही लाभार्थी शेतकरी ही बियाण्यांची पाकिटे स्वतः लागवडीसाठी न वापरता विक्री करत असल्याची चर्चा पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत..या अभियानात प्रत्येक शेतकरी गटात २५ सदस्यांचा समावेश असून प्रत्येक सदस्याला सहा बियाण्यांची पाकिटे देण्यात आली आहेत. त्यानुसार एका गटाला एकूण १५० पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. काही गटांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात बियाण्यांची पाकिटे मिळाली आहेत. त्यापैकी काही पाकिटे पुन्हा कृषी सेवा केंद्रांकडे विक्रीसाठी दिल्याची चर्चा सुरू आहे..Cotton Productivity Mission: ‘कापूस कांती’ अंतर्गत ४ हजार ५८८ हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके.कृषी विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या काही कंपन्यांची बियाण्यांची पाकिटे सुमारे ५०० रुपये प्रति पाकीट या दराने विकली जात असल्याचे बोलले जात आहे. प्रामुख्याने अकोला, बाळापूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांत अशा प्रकारची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही कारवाई अथवा प्रकरण नोंदविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली नाही..Cotton Productivity Mission: ‘कापूस कांती’ अंतर्गत ४ हजार ५८८ हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके.दरम्यान, शासनाच्या अनुदानातून मिळालेल्या बियाण्यांची विक्री करणे नियमबाह्य असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. अभियानांतर्गत प्रात्यक्षिके शंभर टक्के राबविण्याची जबाबदारी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. .लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष लागवड होत असल्याची खात्री करावी, अनधिकृत विक्री आढळल्यास आवश्यक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. यासंदर्भातील संदेश समाजमाध्यमांवरही प्रसारित होतआहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.