Government Personnel Appointment: राज्याच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदी सुभाष महादेव काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयात गुणनियंत्रण विभागानंतर विस्तार विभाग महत्त्वाचा समजला जातो. या पदावर रफिक नाईकवाडी पूर्णवेळ संचालक होते. त्यांच्या निवृत्तीनंतर स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख यांच्याकडे तीन महिने पदभार देण्यात आला होता. .परंतु, आता देशमुखदेखील निवृत्त झाल्याने या पदाची सूत्रे कोणाकडे जाणार या बाबत राज्यभर उत्सुकता होती. संचालकाचा पदभार देण्यासाठी राज्य शासनाला आयुक्तालयाने पाठविलेल्या सहसंचालकांच्या यादीतून अखेर काटकर यांच्या नावाला कृषी मंत्रालयाने हिरवा कंदील दिला. ते सध्या पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक आहेत..Gram Panchayat Administrator Appointment: ग्रामपंचायत प्रशासकांच्या नियुक्तीचा पेच कायम.कृषी विभागाचे उपसचिव अंबादास चंदनशिवे यांनी जारी केलेल्या नियुक्ती आदेशात काटकर यांनी सहसंचालकाचे काम सांभाळून विस्तार संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहावा, असे नमूद केले आहे..Illegal Inspector Appointment: जिल्हा परिषदांनी नेमले परस्पर गुणनियंत्रण निरीक्षक.‘ॲग्रोवन’शी बोलताना काटकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेतीविषयक नियोजनात विस्तार विभाग मोलाची भूमिका बजावतो. दुष्काळ निवारणासारख्या संवेदनशील विषयदेखील या विभागाचा सहभागातून हाताळला जातो..दुष्काळासारख्या प्रतिकूल स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून लढण्यासाठी बळ मिळवून देण्यात व तळागाळातील शेतकऱ्यांच्या कामांना न्याय देणाऱ्या नियोजनास माझे प्राधान्य राहील.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.