Latur News: अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याच्याप्रति संवेदना बाळगत दोन ते दहा ऑक्टोबर दरम्यान येथील नेटीझन्स फाउंडेशन स्कूलच्या सहाशे विध्यार्थ्यानी मदत फेरी काढून अडीच लाखांपेक्षा अधिक निधी जमा केला. .निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालकांनी बुधवारी (ता. २६) जिल्हाधिकारी वर्षा घुगे - ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. निधीत संस्थेनेही अडीच लाखाची भर टाकली असून त्यातून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत..Gujarat Farmer Relief Package: गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री पटेल यांची घोषणा.अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचे योगदान व मदत फेरीतून दोन लाख ५५ हजार पाचशे तीस रुपये निधी जमा झाला. विद्यार्थ्यांच्या बरोबरीने निधी देण्याचे आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आले होते. त्यानुसार अडीच लाखांचे योगदान संस्थेने दिले. .Farmer Loan Waiver: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठित करणार .निधी संकलनासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दिला. संस्थेमार्फत जमा झालेल्या निधी पैकी शेतकऱ्यांना थेट मदत म्हणून एक लाख आठ हजार रुपये..स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत स्वरूपात ४७ हजार ५३० रुपये व शेतकरी तसेच कष्टकरी विद्यार्थी कल्याण ठेव निधी म्हणून एक लाखाची कायमस्वरूपी ठेवीच्या स्वरूपात बँकेत जमा करण्यात आल्याचे फाउंडेशनचे संचालक सुधाकर तोडकर यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.