पंजाबमधील अमृतसरमध्ये पीक अवशेष जाळण्याच्या घटना ८० टक्क्यांनी कमी झाल्या गेल्या वर्षी पीक अवशेष जाळण्याच्या ३७८ घटना समोर आल्या होत्यात्या तुलनेत यावर्षी ७३ घटना घडल्या पीक अवशेष जाळत नसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जात आहे.Stubble Burning: पंजाबमधील अमृतसरमध्ये पीक अवशेष जाळण्याच्या घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. याबाबत माहिती अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी दिली. गेल्या वर्षी पीक अवशेष जाळण्याच्या ३७८ घटना समोर आल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात ७३ घटना घडल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.."अमृतसरमध्ये ६० टक्के पीक कापणी झाली आहे. कारण हा भाजीपाला पीक पट्टा आहे. त्यामुळे येथे कापणी लवकर सुरू होते. गेल्यावर्षी, आमच्याकडे पीक अवशेष जाळण्याच्या सुमारे ३७८ घटना उघडकीस आल्या होत्या. यावर्षी ७३ घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्के कमी झाले आहे." असे त्यांनी पुढे सांगितले..प्रशासनाकडून पीक अवशेष जाळत नसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कॉल सेंटर स्थापन केले आहेत..Stubble Burning : शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळाल तर दंड भराल."आम्ही शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करत आहोत आणि त्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहे. तसेच मंडईत एक मदत केंद्रदेखील उपलब्ध केले आहे. यामुळे ते त्यांच्या पिकांबाबत वेळापत्रक तयार करु शकतील. जी काही उपलब्ध संसाधने आहेत; त्यांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आम्ही आंतर-सहकारी संस्थांना कर्ज देण्याची परवानगी दिली आहे. जे शेतकरी त्यांच्या शेतात पीक अवशेष जाळत नाहीत; त्यांना आम्ही आर्थिक पाठबळ देत आहोत. शेतीशी संबंधित सर्व सेवांसाठी आम्ही एक खिडकी योजना सुरु केली आहे," असे साहनी यांनी नमूद केले..पिकांचे अवशेष जाळल्याने होणारे दुष्परिणाम | Stubble Burning problems | ॲग्रोवन.याआधी, पर्यावरण अभियंते सुखदेवा सिंग यांनी म्हटले होते की, पंजाबमध्ये १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत पीक अवशेष जाळण्याच्या ४५ घटनांची नोंद झाली. यातील २२ ठिकाणी आग लागल्याचे दिसून आहे. तर २२ ठिकाणी पर्यावरणीय दंड आकारण्यात आला. त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात आली..पर्यावरण अभियंते सुखदेव सिंग यांनी सांगितले, "आम्ही उपग्रहांच्या अहवालाच्या आधारे, पीक अवशेष जाळण्याच्या ४५ घटना आढळून आल्या. आमच्या प्रोटोकॉलनुसार, आम्ही २४ तासांच्या आत या घटनांची तपासणी केली. त्यातील केवळ २२ ठिकाणी आग लागल्याचे दिसून आले. आम्ही सर्व २२ प्रकरणात दंड लागू केला आहे. त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई म्हणून एफआयआरदेखील दाखल केले आहेत.".गेल्यावर्षी, शेतात अवशेष जाळण्याच्या ५९ घटनांची नोंद झाली. त्यासाठी उपग्रह सर्वेक्षण १५ सप्टेंबर रोजी सुरू झाले. १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत अशा ४५ घटना समोर आल्या. गेल्या वर्षी, १५ ते २७ सप्टेंबर दरम्यान, पावसाळ्याचे दिवस होते. शेतात ओल असल्याने आग पेटवली जात नाही. पण यावेळी, जर तुम्ही बारकाईने नजर टाकल्यास, १५ ते २७ सप्टेंबर दरम्यान कोरडे हवामान होते, असे सिंग यांनी अधिक माहिती देताना सांगितले..आम्हाला असेही आढळून आले आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक कापणी लवकर होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षी, ३० तारखेच्या सुमारास २० टक्के पीक कापणी झाली होती. यंदा कापणी लवकर होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यानुसार, तक्रारी कमी आहेत," असे ते म्हणाले. .पंजाब आणि इतर उत्तरेकडील राज्यांत कापणीनंतर शेतातील काडीकचरा, पीक अवशेष जाळणे ही एक पर्यावरणाबाबतची गंभीर समस्या आहे. कारण यामुळे हवा प्रदूषण होते. तसेच आरोग्यासाठी हे धोक्याचे आहे. विशेषतः हिवाळ्यात आगीचा धूर धुक्यात मिसळून दाट धुके निर्माण होते. यासाठी शेतकऱ्यांना पीक अवशेष जाळण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.