Kolhapur News: ‘‘महावितरण’ने एक लाख ३५ हजार कोटींचा वाढीव वीज दरवाढीचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाला दिला आहे. त्याला सर्व संघटनांचा तीव्र विरोध आहे. तरीही आयोगाने ही नवीन दरवाढ लागू केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल’, असा इशारा राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी नुकताच येथे पत्रकार परिषदेत दिला..आमदार लाड म्हणाले, ‘‘राज्यात घरगुती, व्यापारी, कृषी, औद्योगिक, रेल्वे आदी वीज ग्राहकांना ‘महावितरण’कडून लघुदाब व उच्चदाब वाहिनीद्वारे विद्युतपुरवठा सुरू आहे. या सर्व ग्राहकांचे वीजदर ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५ ते २०३० साठी वीज दरवाढ करण्याकरिता महावितरणची सुनावणी होऊन २८ मार्च २०२५ रोजी दरवाढीचा निर्णय झाला. .Electricity Consumer Protest: वीज दरवाढीला ग्राहकांचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा.त्याप्रमाणे वीज बिले येऊन ती सर्व ग्राहकांनी दर महिन्याला भरली; परंतु महावितरणने जादा वीजदरवाढीसाठी एक मागणी पत्र दिले. त्यानुसार आयोगाने दुसरा आदेश २५ जून २०२५ ला दिला. पहिली दरवाढ १५ टक्के व दुसरी दरवाढ पुन्हा १५ टक्के, अशी मागणी करण्यात आली. मूळ प्रस्तावात २० टक्के दरवाढीची मागणी असताना गरजेपेक्षा जादा १० टक्के दरवाढ दिल्यानंतर सर्व वीज ग्राहक संघटना उच्च न्यायालयात गेल्या. त्यानुसार ता. २ ते ८ जानेवारीपर्यंत सहा ठिकाणी विभागवार सूचना व हरकती घेऊन सुनावण्या झाल्या..Smart Electricity Meter : नागपुरात फडणवीसांच्या पोस्टरला काळे फासले, बावनकुळेंच्या गाडीवर भिरकावला बूट .दरवाढीला आक्षेपपुण्यामध्ये झालेल्या सुनावणीला कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली, सोलापूरचे वीज ग्राहक उपस्थित होते. या वेळी आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब देवकर, भारत पाटील-भुयेकर, जे. पी. लाड यांनी दरवाढीबाबत जोरदार आक्षेप घेत हरकती नोंदविल्या. .तसेच महावितरणच्या कारभारावरही ताशेरे ओढले. त्याचबरोबर महावितरणने वारंवार वीज दरवाढ न करता कारभार सुधारावा, गळती व चोरीचे प्रमाण कमी करून ग्राहकांना योग्य दाबाने व माफक दरात वीज द्यावी, अशी मागणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.