Farmer Loss: मुरबाड तालुक्यातील विविध गावांमध्ये मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धसई परिसरातील आल्याणी गावातही असेच चित्र आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती केली आहे. मात्र, मोकाट जनावरांच्या उच्छादामुळे त्यांची मेहनत वाया जात आहे..उमरोली, धसई, इंदे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शिमला मिरची, काकडी, भेंडी अशा भाजीपाल्यांची लागवड केली आहे. मात्र, कोणत्याही वेळी ही जनावरे शेतात घुसून भाजीपाला खात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे..Unseasonal Rain Damage: बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीमुळे ३,८०० हेक्टरवर पिकांचे नुकसान.मेहनत व खर्च करून उभ्या केलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. .Wild Animal Crop Damage: बहादरपूरला वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान.संबंधित जनावरांच्या मालकांनी जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .प्रशासनाने तत्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून संबंधित मालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित शेती पऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.