Global Trade Shipping Disruption: इराणने निश्चित केलेल्या मार्गावरून न गेल्यामुळे ‘होर्मूझ’च्या सामुद्रधुनीमध्ये एक जहाज अडकल्याचे वृत्त इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने बुधवारी दिले. हे जहाज एका विदेशी कंपनीचे कंटेनर जहाज असल्याचे सांगण्यात आले असले, तरी याबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही..‘होर्मूझ’च्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण असल्याचा दावा इराणने केला असून, या घटनेकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. दुसरीकडे, इराणमधील युद्ध कायमस्वरूपी थांबवण्यासाठी अमेरिकेचे पश्चिम आशियातील दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुश्नर कतारमधील दोहा येथे चर्चेसाठी दाखल झाले आहेत..Hormuz Strait Fertilizer Trade: होर्मूझमधून युरियाची पहिली खेप रवाना.कतारमध्ये राजनैतिक स्तरावर तांत्रिक चर्चा सुरू झाली आहे. मात्र ‘होर्मूझ’ व लेबनॉनच्या मुद्द्यावरून मतभेद कायम आहेत. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने म्हटले आहे, की संबंधित जहाजाने निवडलेल्या मार्गावर पाणी कमी असल्याने ते अडकून पडले. .US Iran Peace Deal: अमेरिका-इराणमध्ये शांतता करार.जहाजांनी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. इराणने ठरवून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त इतर मार्गाचा वापर केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने दिला आहे..‘युद्धासाठीही आम्ही तयार’कतारचे परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी आणि अमेरिकन शिष्टमंडळ यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्य यावर चर्चा करण्यात आली. लेबनॉनमधील हिज्बुल्ला आणि इस्राईलमधील संघर्ष थांबवण्याबाबतही इराणने आग्रही भूमिका घेतली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालीबाफ यांनी सांगितले, की युद्ध संपवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र चर्चा यशस्वी न झाल्यास आम्ही युद्धासाठीही तयार आहोत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.