Banana Farmers Issues: रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वडजी येथील शिवाजी पंडितराव बोरकर यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. दोन एकरांत लागवड केलेली केळीबाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे..शिवाजी बोरकर यांनी १५ ऑगस्ट रोजी दोन एकरांत सुमारे २८०० केळीच्या झाडांची लागवड केली होती. .Banana Crop Damage: बारामती तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागांचे नुकसान.जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीची झाडे कोसळली. नुकसान झालेल्या केळी बागेची पाहणी करून संबंधित महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करावा .Banana Crop Damage: जळगाव जिल्ह्यात वादळामुळे केळीचे मोठे नुकसान.तसेच शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे..केळी बागेसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. उत्पादनाच्या आशेवर कुटुंबाचे नियोजन केले होते. मात्र वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई द्यावी.-शिवाजी पंडितराव बोरकर, शेतकरी, वडजी, जि. वाशीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.