Weather Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दरम्यान, कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यांतील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात आणखी दोन-तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे..जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दोन दिवस कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत पहाटे जोरदार पाऊस झाला, तर गुरुवारी सायंकाळी संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. .Latur Rain Damage: पूर्वमोसमी पावसाचा तेराशे हेक्टरला फटका.सायंकाळी सातच्या सुमारास कुडाळ परिसरातील अनेक गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या भागात दहा ते पंधरा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागांत विजांचा गडगडाट सुरू झाला. मात्र रात्री बारा वाजल्यानंतर सावंतवाडी शहरात वादळी वारे वाहू लागले..Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका.जोरदार वाऱ्यांमुळे काही इमारतींच्या पत्र्यांच्या शेडचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मोती तलाव व शिव उद्यान परिसरात झाडे उन्मळून पडली. रामेश्वर प्लाझा व एस.पी. कॉलेज परिसरात इमारतींच्या छपरांचे नुकसान झाले. त्यानंतर या परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. याशिवाय आंबोली परिसरातही जोरदार पाऊस झाला, तर वेंगुर्ला तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. .जिल्ह्याच्या इतर भागांतही पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यात आंबा काढणी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.